Delhi Chief Minister Arvind Kejriwal & Manish Sisodia  Twitter / @ArvindKejriwal
देश

Arvind Kejriwal: CM केजरीवाल म्हणाले, 'माझं इंग्रजी तितकं चांगलं नाही, जितकं...'

Delhi Chief Minister Arvind Kejriwal & Manish Sisodia: दिल्लीतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणखी एक 'स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स' सुरु करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Chief Minister Arvind Kejriwal: दिल्लीतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणखी एक 'स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स' सुरु करण्यात येत आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेता येणार आहे.

सीएम अरविंद केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगळ्या स्पेशलाइज्ड स्कूल ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जात आहे. गुरुवारी सुरु झालेल्या या शाळेत अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास होणार आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, दिल्ली उच्च न्यायालयाची नवीन इमारत नुकतीच बांधण्यात आली आहे. ती एक अप्रतिम इमारत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या भव्य इमारतीची रचना करणाऱ्या आर्किटेक्टने या शाळेची रचनाही केली होती. ते दिल्लीचे सर्वात मोठे शिल्पकार आहेत.

4 हजार 400 जागांवर प्रवेशासाठी 96 हजार अर्ज आले आहेत

शाळेत 45 वर्ग खोल्या आहेत, ही शाळा 8600 चौरस मीटरमध्ये पसरलेली असून संपूर्ण इमारतीत 112 खोल्या आहेत. यात 45 वर्ग खोल्या, 8 प्रयोगशाळा, 1 ग्रंथालय, एक बहुउद्देशीय हॉल, 13 अधिकारी आणि कर्मचारी कक्ष, 26 शौचालये, 5 जिने आणि 2 लिफ्ट आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीच्या उत्कृष्ट शाळांमध्ये 4,400 जागांसाठी 96,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, डॉ. बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्समध्ये 1600 मुलांना खाजगी शाळांपेक्षा चांगले शिक्षण मिळेल.

तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी बी.आर. आंबेडकर स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एक्सलन्स अंतर्गत नवनिर्मित स्पेशलाइज्ड एक्सलन्स स्कूलचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, भारताच्या इतिहासात याआधी आपल्या देशात कुठेही इतकी भव्य सरकारी शाळा बांधली गेली असेल असे मला वाटत नाही. कदाचित 75 वर्षात पहिल्यांदाच सरकारी शाळा इतकी भव्य बनवली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT