Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

'...पण गुंडगिरीने देशाची प्रगती होणार नाही'

केजरीवाल (Arvind Kejriwal) महत्त्वाचा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीतील राजकारण चांगलचं तापलं आहे. या हल्ल्यावरुन आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आता या घटनेवर सीएम केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. केजरीवाल महत्त्वाचा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ''मी खूप छोटा माणूस आहे, माझा जीवही देशासाठी आहे, परंतु अशा गुंडगिरीने देशाची प्रगती होणार नाही.''

केजरीवाल म्हणाले की, '21व्या शतकातील भारतासाठी प्रेमाने काम करावे लागेल. मारहाण आणि गुंडगिरीत 75 वर्षे वाया गेली.' भाजपवर (BJP) निशाणा साधत ते पुढे म्हणाले, 'देशाच्या सत्ताधारी पक्षाने राजधानीत गुंडगिरी केली तर तरुणांमध्ये काय संदेश जाईल.'

दरम्यान, या प्रकरणी आता आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) आमदार सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काल पोलिसांनी ‘भाजपच्या गुंडांना’ रोखण्यासाठी आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांना सहजरित्या जाऊ देण्याची व्यवस्था केली, असा आरोप दिल्ली पोलिसांवर त्यांनी केला आहे. याचिकेत सौरभ भारद्वाज यांनी कालच्या निदर्शनाला अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला असे म्हटले आहे. यासोबतच कलम 226 अंतर्गत दिल्ली पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. काल घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणारी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची चर्चा दिल्लीच्या राजकारणात जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT