भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अभिमानास्पद क्षण नोंदवत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० क्रिकेटमध्ये नवा टप्पा गाठला आहे. अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेत ओमानविरुद्धच्या सामन्यात त्याने एका खेळाडूला बाद करत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले. यासह अर्शदीप टी-२० मध्ये १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. या विक्रमामुळे त्याचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
शुक्रवारी ओमानविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्शदीपकडे ९९ बळी होते आणि फक्त एका बळीची गरज होती. सामन्यातील त्याच्या चौथ्या षटकात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली. भारतीय संघासाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता अर्शदीप अव्वलस्थानी पोहोचला आहे. त्याच्या नंतर युजवेंद्र चहल (९६ बळी, ८० सामने), हार्दिक पंड्या (९५ बळी, ११७ सामने), जसप्रीत बुमराह (९२ बळी, ७२ सामने) आणि भुवनेश्वर कुमार यांचा क्रमांक लागतो. ओमानविरुद्धचा सामना गाठला नसला तरी बुमराहचा या यादीतील सहभाग उल्लेखनीय आहे.
याशिवाय, अर्शदीपने फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवरील विक्रमही मोडला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा जगातील सर्वात जलद वेगवान गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानच्या नावावर होता. रशीदने २०२१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या ५३ व्या सामन्यात हा टप्पा पार केला होता. अर्शदीपने त्याहून कमी सामन्यांत हा टप्पा गाठत क्रिकेटविश्वाला दाद द्यायला भाग पाडले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १० सामन्यांमध्ये १८ बळी आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या १० सामन्यांमध्ये १४ बळी घेतलेल्या अर्शदीपने आपली सातत्यपूर्ण गोलंदाजी सिद्ध केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.