iPhone 17 Series Dainik Gomantak
देश

iPhone 17 Series: iPhone 17 सिरीजची डिझाईन लीक! मिळणार Pixel सारखा रियर कॅमेरा मॉड्यूल

iPhone 17 Series Design Leak: टेक जायंट कंपनी ॲपल त्यांची iPhone 17 सीरीज 2025 च्या अखेरीस लाँच करण्याची शक्यता आहे.

Sameer Amunekar

Apple iPhone 17 Series Design

टेक जायंट कंपनी ॲपल त्यांची iPhone 17 सीरीज 2025 च्या अखेरीस लाँच करण्याची शक्यता आहे. या फ्लॅगशिप मॉडेलची आतापासूनच चर्चा होत आहे. या फोनच्या लूकविषयी चर्चा रंगली आहे. हा एकदम स्लिम व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयफोन 17 सिरीजच्या डिझाइनबद्दल माहिती लीक आली आहे.

आयफोन 17 सिरीजबाबत अनेक लिक्स आतापर्यंत समोर आले आहेत. आता या सिरीजचं बॅक कॅमेरा मॉड्यूल कसं असेल याबाबत माहिती समोर आली आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार, आयफोन 17 स्मार्टफोनचे कॅमेरा मॉड्युल डिझाईन गुगल पिक्सल फोन सारखे असण्याची शक्यता आहे. पिक्सल फोनमध्ये रिअर पॅनलमध्ये असाच कॅमेरा सेट्अप आयफोन 17 मध्ये असण्याची शक्यता आहे.

iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air या मॉडेल्समध्ये कॅमेरा मॉड्यूल डिव्हाइसच्या वरच्या मागील पॅनलवर असेल, जो ॲपलच्या स्क्वेअर कॅमेऱ्याच्या तुलनेत एक मोठा डिझाइन बदल असेल.

iPhone 17 मालिकेत iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air. यामध्ये iPhone 17 Air हे चार नवीन मॉडेल्स सादर केली जाणार आहेत. iPhone 17 Air हा एक विशेष मॉडेल असेल, कारण हा फोन अतिशय पातळ डिझाइन असलेला फोन असू शकतो.

लीक झालेल्या माहितीनुसार, iPhone 17 Air ची जाडी केवळ 5.5 ते 6 मिमी दरम्यान असू शकते, ज्यामुळे हा अॅपलच्या आतापर्यंतच्या सर्वात बारीक स्मार्टफोन्सपैकी एक असण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये या सिरीजचे अधिकृत लाँच होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

SCROLL FOR NEXT