Jama Masjid Dainik Gomantak
देश

Jama Masjid: जामा मशिदीचा 'महिलाविरोधी' फर्मान, महिलांच्या प्रवेशावर बंदी

Jama Masjid: जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरुन दिल्ली महिला आयोगाने मशिदीच्या इमामाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Jama Masjid: जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरुन दिल्ली महिला आयोगाने मशिदीच्या इमामाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाला यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

स्वाती मालीवाल (Swati Maliwal) म्हणाल्या की, 'जामा मशिदीत महिलांचा (Women) प्रवेश बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. पूजेचा जितका अधिकार पुरुषाला आहे, तितकाच स्त्रीलाही आहे. मी जामा मशिदीच्या इमामाला नोटीस बजावत आहे. महिलांच्या प्रवेशावर अशा प्रकारे बंदी घालण्याचा अधिकार कोणालाही नाही.'

जामा मशिदीच्या तीनही प्रवेशद्वारांवर एक सूचना फलक लावण्यात आला आहे, ज्यावर 'जामा मशिदीत एकटी मुलगी किंवा मुलींचा प्रवेश निषिद्ध आहे', असे लिहिले आहे.

शाही इमाम यांचे काय म्हणणे आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी सांगतात की, 'मुली (Girl) आपल्या बॉयफ्रेंडसोबत मशिदीत येतात अशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे अशा मुलींना एकट्याने येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.'

शाही इमाम पुढे म्हणाले की, 'जर एखाद्या महिलेला जामा मशिदीत यायचे असेल तर तिला तिच्या कुटुंबीयांसह किंवा पतीसोबत यावे लागेल.' नमाज पठणासाठी येणाऱ्या महिलेला रोखले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Sextortion Case: धमकी, मारहाण अन् सेक्सटॉर्शन; म्हापसा येथील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या डेहराडूनमधून गजाआड

Guru Chandal Yog: गुरु-चांडाल योगाचा अशुभ प्रभाव, तीन राशींची धाकधूक वाढली; पैशांची चणचण आणि आजारपण वाढणार

Goa Crime: धारदार शस्त्रानं थेट गळ्यावर वार... मोबोर समुद्रकिनाऱ्यावर छत्तीसगडच्या तरुणाची हत्या, तिघांवर गुन्हा दाखल

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ, नवीन दर तपासा

Cricketer Death: 4 ओव्हर्स टाकल्या अन्... LIVE मॅच दरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा!

SCROLL FOR NEXT