Madhya Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Crime: तालिबानी शिक्षा! आधी पाय बांधले, नंतर अर्धनग्न करुन बेदम मारहाण केली; गावकऱ्यांनी...

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील माखन नगरमध्ये तीन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील माखन नगरमध्ये तीन तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून अशा प्रकारची शिक्षा व्हायला हवी, असे म्हटले जात आहे.

गावकऱ्यांनी या तिघांना अमानुषपणे लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. मारहाणीची घटना 13 जुलैची सांगितली जात आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यानंतर माखन नगर पोलिसांनी (Police) 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीनही जखमी तरुण जावळी गावचे रहिवासी आहेत. जखमी तरुणांवर गुन्हेही नोंद आहेत, त्यापैकी एक तरुण जिलाबदर येथे राहत होता. तिघेही तरुण बदमाश असून ते गावकऱ्यांना त्रास देत होते, असेही सांगण्यात येत आहे.

तीन तरुणांचे हातपाय बांधून लाठ्या काठ्यांनी मारहाण

दुसरीकडे, गुरुवारी दुपारीच अमजद अली उर्फ ​​गोगा, सौरभ नागवशी आणि पिन्नू नागवशी हे युवक गावातील लल्लू मामूच्या दुकानाजवळ उभे होते. दरम्यान, ते गावकऱ्यांना अश्लील शेरेबाजी करत होते. यानंतर गावातील रहिवासी बलराम सौर. दिलीप सौर, विक्रम सौर, कन्हैया सौर, सोनू सौर आणि सुमित सौर यांनी मिळून तिघांचेही पाय बांधून त्यांना जमिनीवर झोपवले आणि बेदम मारहाण केली.

तरुणांचे हात आणि पाय फ्रॅक्चर

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, तिन्ही तरुण अर्धनग्न असून त्यांचे पाय बांधलेले आहेत. 5-6 लोक लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आहेत. मोठा जमाव हा तमाशा पाहत आहे. दरम्यान त्यांना वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांना सुमारे एक तास मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिघांनाही जिल्हा रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. तरुणांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT