Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

केजरीवाल सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत, एलजीने दिले चौकशीचे आदेश

दिल्लीच्या केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

BJP Alleges Delhi Government Of Scam: दिल्लीच्या केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दिल्लीतील नव्याने प्रस्तावित रुग्णालयांबाबत हे आरोप केले आहेत. मनोज तिवारी यांनी सोमवारी या भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित अनेक कागदपत्रे शेअर केली आहेत. (another corruption allegation on kejriwal government lg orders probe shocking documents revealed aap vs bjp)

मनोज तिवारी यांनी 'आप' वर गंभीर आरोप केले

मनोज तिवारी म्हणाले की, 'आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये 'मल्टी लेयर' घोटाळे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्री आणि सरकारचे अधिकारी दिल्लीतील जनतेचा पैसा खाण्यात व्यस्त आहेत.'

एलजीने चौकशीचे आदेश दिले

मनोज तिवारी यांनी भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपांशी संबंधित अनेक कागदपत्रेही सादर केली. यावेळी बोलताना तिवारी म्हणाले की, 'रुग्णालयांच्या बांधकामापासून ते निवडीपर्यंत, जेईपासून ते सरकारमधील मंत्री घोटाळ्यांमध्ये गुंतले आहेत. दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरांनी एसीबीला चौकशीचे निर्देश दिले आहेत.'

मनीष सिसोदिया यांनी नकार दिला

भाजपच्या (BJP) या आरोपांवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी आज भाजप आणि एलजीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'एलजी साहेबांनी एक वर्ष जुन्या तक्रारीवर कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. मात्र पूर्व एलजी अनिल बैजल यांनी त्यावेळी ही तक्रार नाकारली होती.' मनीष सिसोदिया यांनी एलजीवर भाजप कार्यकर्त्यांसह दिल्ली सरकारचा छळ केल्याचा आरोपही केला होता. मनीष सिसोदिया यांनीही आज दिल्लीच्या एलजीला या प्रकरणी पत्र लिहिले आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी भाजप खासदार 22 जून रोजी या रुग्णालयांना भेट देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT