Road Accident In Andhra Pradesh Dainik Gomantak
देश

Road Accident: आंध्र प्रदेशात भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू; 20 जखमी

Road Accident In Andhra Pradesh: मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 2 वाजता श्रीकालहस्तीकडे जाणाऱ्या ट्रकने बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Manish Jadhav

Road Accident In Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे लॉरी आणि बसची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 2 वाजता श्रीकालहस्तीकडे जाणाऱ्या ट्रकने बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत

दरम्यान, धडकल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि पलीकडून येणाऱ्या एका खासगी बसला धडक दिली. अपघाताची माहिती देताना डीएसपी व्यंकटरमन यांनी सांगितले की, नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे लॉरी आणि बसची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. त्यांनी पुढे सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कानपूर रोड अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला

याआधी उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमध्ये मोठा रस्ता अपघात झाला होता. येथे टिळक समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या प्रवशांची गाडी नाल्यात पडली होती. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर दोन मुले किरकोळ जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमी इटावा येथील टिळक समारंभातून घरी परतत होते. कानपूर देहाटमधील सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील जगन्नाथपूर गावाजवळ हा अपघात झाला.

छत्तीसगडमध्येही हा अपघात झाला

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात बुधवारी एका ट्रकने दुसऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिल्याने किमान चार जण ठार तर 10 जण जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किमी अंतरावर असलेल्या नामेड पोलीस स्टेशन परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील मिंगाचल गावाजवळ हा अपघात संध्याकाळी घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

Mrunal Thakur Apologizes: बिपाशाला 'पुरुषांसारखी' म्हणणं मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलं महागात; नेटकऱ्यांच्या टीकेनंतर मागितली माफी, म्हणाली- 'मी 19 वर्षांची...'

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! शुभमन, सिराजबाबत प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू

Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

SCROLL FOR NEXT