Andhra Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh Crime: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ट्यूशनला जात असताना...

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तुम्हीही या घटनेबद्दल ऐकल्यानंतर हादरुन जाल.

Manish Jadhav

Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तुम्हीही या घटनेबद्दल ऐकल्यानंतर हादरुन जाल. बापटला जिल्ह्यात शुक्रवारी काही लोकांनी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला जिवंत जाळले.

तो ट्यूशनसाठी जात असताना ही घटना घडली. यू अमरनाथ असे 15 वर्षीय मुलाचे नाव आहे. ही बाब पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्याला (Student) गंभीर अवस्थेत गुंटूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास तो सायकलवरुन ट्यूशनसाठी जात असताना ही घटना घडली.

दरम्यान, रेडलापलेमजवळ काही अज्ञातांनी त्याला अडवले. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. आग लागताच आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दुसरीकडे, अमरनाथवर माचिसची काडी टाकताच त्याने आरडाओरडा सुरु केला. त्याचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक (Citizen) धावून आले आणि त्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवताच त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

वेंकटेश्वर रेड्डी आणि इतर काही जणांनी त्याला पेटवून दिल्याचे मुलाने आपल्या मरणासन्न निवेदनात पोलिसांना सांगितले. दरम्यान, अमरनाथचे आजोबा रेड्डैया यांनी सांगितले की, अमरनाथच्या बहिणीला त्रास देणारा मुलगाच या हत्येला जबाबदार आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला

ते पुढे म्हणाले की, अमरनाथने काही दिवसांपूर्वी या लोकांना खडसावले होते, कारण ते त्याच्या बहिणीला सतत त्रास देत होते. अमरनाथने आरोपींकडे वारंवार कॉलेजमध्ये येण्याबाबत चौकशी केली होती. त्याची बहीण या कॉलेजमध्ये शिकत होती.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत, मात्र ते पकडले जात नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT