Andhra Pradesh devotee offers Rs 100 crore cheque at temple: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. सिंहाचलम टेकडीवर असलेल्या श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या दानपेटीत एका भक्ताने चक्क 100 कोटी रूपयांचा चेक टाकला. चेक पाहून मंदिर प्रशासन चक्रावून गेले.
मंदिर व्यवस्थापनानं धनादेश वठवण्यासाठी बँकेशी संपर्क साधला, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले.
श्रीवराह लक्ष्मी नरसिंहा स्वामी वारी देवस्थान मंदिरातील दानपात्रात जमा झालेल्या पैशांची मोजदाद सुरू होती. त्यात व्यवस्थापनाला 100 कोटी रुपयांचा चेक सापडला. एवढ्या मोठ्या रक्कमेचा चेक पाहून मंदिर व्यवस्थापन आनंदात होतं. चेकवर बोड्डेपल्ली राधाकृष्ण नावाच्या व्यक्तीची स्वाक्षरी आढळून आली. व्यक्तीने चेकवर कोणतीही तारीख टाकलेली नव्हती.
दानपात्रात जमा केलेला हा धनादेश कोटक महिंद्रा बँकेचा होता. मंदिर व्यवस्थापनातील पदाधिकारी धनादेश वठवण्यासाठी बँकेत पोहोचले. मात्र, या व्यक्तीच्या खात्यात फक्त 17 रुपये शिल्लक रक्कम होती.
दरम्यान, या घटनेनंतर चेकचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मस्करी करण्याच्या उद्देशाने कोणीतरी हा धनादेश मंदिरातील दानपेटीत टाकला असावा अशा प्रतिक्रिया सोशल मिडियातून समोर येत आहेत.
विविध माध्यमातून समोर आलेल्या वृत्तानुसार याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण, चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.