Delhi violence Dainik Gomantak
देश

Delhi Violence: विहिंप, बजरंग दलाच्या आयोजकांविरुद्ध FIR दाखल

हनुमान जयंतीनिमित्त राजधानीच्या जहांगीरपुरी भागात परवानगीशिवाय मिरवणूक काढण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Violence: हनुमान जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात परवानगीशिवाय मिरवणूक काढण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल (Bajrang Dal) दिल्ली (Delhi) प्रांताच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिंपच्या जिल्हा सेवा प्रमुखाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (An FIR has been lodged against VHP and Bajrang Dal organizers in the Delhi Jehangirpuri violence case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांविरुद्ध- विश्व हिंदू परिषद, बजरंग दल दिल्ली प्रांत, मुखर्जी नगर जिल्हा, झंडेवाला यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 188 नुसार मिरवणूक काढल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख प्रेम शर्मा याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी जहांगीरपुरी भागात दोन समुदायांमध्ये हिंसाचार उसळला.

दरम्यान, पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी झालेल्या हिंसाचारात दगडफेक झाली. त्यामध्ये काही वाहनेही जाळण्यात आली. जहांगीरपुरीमध्ये शनिवारी झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आठ पोलिसांसह नऊ जण जखमी झाले आहेत.

तसेच, दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सोमवारी सांगितले की, ''जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत दोन्ही समुदायातील 23 लोकांना अटक करण्यात आली आहे, दरम्यान, सततच्या अटकेदरम्यान, पोलिसांच्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.''

दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "दोन्ही समुदायातील लोकांसह 23 जणांना अटक करण्यात आली आहे. जो कोणी दोषी असेल, तो वर्ग, पंथाचा विचार न करता, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. मग तो कोणत्याही धर्माचा किंवा समुदायाचा असो." आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. चार फॉरेन्सिक पथकांनी आज घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल मीडियाचे विश्लेषण केले जात आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT