Jammu Bus Accident Video ANI
देश

Jammu Bus Accident Video: वैष्णोदेवीला जाणारी बस जम्मूमध्ये दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू, चार गंभीर

वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली बस अमृतसरहून कटराला जात असताना नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली

Pramod Yadav

Jammu Bus Accident Viral Video: जम्मूमध्ये भीषण बस अपघात झाला असून त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली बस अमृतसरहून कटराला जात असताना नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. झज्जर कोटली भागात हा अपघात झाला आहे.

अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, आणखी बारा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ पोहोचलेल्या पोलिसांनी बचावकार्य केले आणि सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवले. या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

बसमध्ये सुमारे 70-75 लोक होते, त्यापैकी काहींचा जागीच मृत्यू झाला. काहींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशी माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं होणार कमबॅक; चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Mitchell Starc World Record: रेकॉर्ड ब्रेक! मिचेल स्टार्कनं रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज

FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

SCROLL FOR NEXT