Amritsar Blast Ani| Twitter
देश

Amritsar Blast: पंजाब हादरले! अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आणखी एक बॉम्ब स्फोट

शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून 200 मीटर अंतरावर हा स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

Amritsar Blast: पंजामधील अमृतसर येथे पुन्हा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात दुसऱ्यांदा स्फोटाची घटना समोर आली आहे. दरबार साहिब हेरिटेज स्ट्रीटजवळ आज सकाळी (8 मे) सकाळी आणखी एक स्फोट झाला. शनिवारी (7 मे) रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून 200 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. पोलिस यंत्रणा घटनेचा तपास घेत आहे.

श्री हरिमंदिर साहिब जवळील हेरिटेज स्ट्रीट परिसरात सोमवारी (8 मे) सकाळी 6:30 वाजता पुन्हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांनी अनेक नमुने ताब्यात घेतले आहेत. जिथे स्फोट झाला, तिथे एक कारही उभी होती, ज्याच्या काचा फुटल्या होत्या. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. डीसीपी परमिंदर सिंग भंडल हेही हेरिटेज स्ट्रीटवर तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.

याआधी शनिवारी रात्री उशिरा सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवरही स्फोट झाला होता. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर काही इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. पण हा दहशतवादी हल्ला नसून अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT