Indian security agencies expose alleged ISI Shahzad Bhatti network Dainik Gomantak
देश

ISI Network Exposed: 14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Shahzad Bhatti Terror Network Busted: स्वातंत्रदिनापूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आयएसआय (ISI) समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ या दहशतवादी सिंडिकेटचा पूर्णपणे पर्दाफाश केला.

Manish Jadhav

Shahzad Bhatti Terror Network Busted: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी एका महत्त्वपूर्ण मोहिमेची माहिती देताना सांगितले की, स्वातंत्रदिनापूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आयएसआय (ISI) समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ या दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश करत मोठा कट उधळला. देशातील 14 राज्यांमध्ये राबवलेल्या एका अत्यंत समन्वयी आणि धाडसी कारवाईत या नेटवर्कच्या 200 हून अधिक ऑपरेटर आणि संशयितांना अटक करण्यात आली. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, या कारवाईदरम्यान देशभरातून 253 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 80 पेक्षा जास्त एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले.

गृहमंत्री शाह यांनी ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या दहशतवादाविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा हा एक उत्तम पुरावा आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी 14 राज्यांमध्ये एकाच वेळी ही व्यापक मोहीम राबवून या खतरनाक दहशतवादी नेटवर्कची पाळेमुळे उखडून टाकली. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी ऑर्डनन्स फॅक्टरीचे शिक्के असलेले ग्रेनेड्स, आयईडी, अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले.

पाकिस्तानमधून (Pakistan) कार्यरत असणारे शहजाद भट्टी नेटवर्क भारतात ग्रेनेड हल्ले, आयईडी स्फोट, पेट्रोल बॉम्ब आणि टार्गेट किलिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होते. एवढेच नव्हे तर हे नेटवर्क स्थानिक लोकांना पैशांचे आमिष दाखवून पोलीस ठाणे, संरक्षण क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांची रेकी करणे तसेच हेरगिरीसाठी गुप्त कॅमेरे बसवण्याचे काम करत होते.

12 ऑगस्ट रोजी गुप्तचर यंत्रणा आणि विविध राज्यांच्या पोलीस दलांनी रिअल-टाइम इंटेलिजन्स शेअरिंग सिस्टीमचा वापर करुन ही संयुक्त कारवाई केली. यात उत्तर प्रदेश (62), हरियाणा (52), दिल्ली (51), पंजाब (44), राजस्थान (15), महाराष्ट्र (8) आणि उत्तराखंड (5) यासह गुजरात, बिहार, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर आणि केरळ या राज्यांमधून संशयितांना पकडण्यात आले. स्वातंत्रदिनाआधी घडवलेला हा मोठा कट वेळेत हाणून पाडल्यामुळे देशावर घोंगावणारे एक मोठे संकट टळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT