Kashmir Terrorism: जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरोधातील कृती आराखड्याबाबत सुरक्षा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. अमित शहा यांनी राजौरी हल्ल्यावर शोक व्यक्त केला.
शहा म्हणाले की, 'खराब हवामानामुळे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचू शकलो नाही. परंतु मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो आहे.' राजौरी जिल्ह्यातील धंगरी गावात 1 जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात नागरिकांचा (Citizens) मृत्यू झाला.
त्यानंतर, गृहमंत्र्यांनी राजभवनाकडे मोर्चा वळवला, जिथे त्यांनी सुरक्षा आढावा बैठकीची अध्यक्षता केली. त्यात लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव ए. के भल्ला, आयबी प्रमुख आणि रॉ प्रमुख, सीआरपीएफ, बीएसएफ आणि यूटी पोलिस महासंचालकांव्यतिरिक्त उपस्थित होते.
शहा म्हणाले की, 'धैर्य दाखवून शोकग्रस्त कुटुंबीयांनी खंबीरपणे लढण्याची भावना दाखवली आहे. एवढ्या मोठ्या अपघातानंतरही ही मोठी गोष्ट आहे. सुरक्षा एजन्सीसोबत सर्व बाबींवर बैठक घेतली आहे. येत्या काळात सुरक्षित ग्रीड बनविण्याची चर्चा आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या सर्व यंत्रणा सज्ज आहेत. या घटना रोखण्यासाठी सुरक्षा दलांचे मनोबल वाढले आहे.'
शहा पुढे म्हणाले की, 'एनआयए आणि पोलिस (Police) दोघेही शनिवारपासून या घटनेचा तपास करतील. गेल्या दीड वर्षात घडलेल्या सर्व दहशतवादी घटनांची चौकशी केली जाणार आहे. रिपोर्टिंग एजन्सी स्वत:ला बळकट करतील. आम्ही दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्सच्या धोरणाने पुढे जात आहोत. राजौरीमध्ये ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना नक्कीच शिक्षा होईल.'
तसेच, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, एका घटनेच्या आधारे घाटीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. सुरक्षा वर्तुळ अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. अमित शाह म्हणाले की, राजौरी दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
गृहमंत्र्यांनी राजभवनाकडे मोर्चा वळवला, जिथे त्यांनी सुरक्षा आढावा बैठकीची अध्यक्षता केली. त्यात लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव एके भल्ला, आयबी प्रमुख आणि रॉ प्रमुख, सीआरपीएफ, बीएसएफ आणि यूटी पोलिस महासंचालकांव्यतिरिक्त उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.