amish tripathi Dainik Gomantak
देश

Indian History: भारताचा इतिहास वसाहतवादी चौकटीतून मुक्त करण्याची गरज; ‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांचे उद्गार

Indian History Colonial Framework: शालेय पाठ्यपुस्तकांमधून आपल्याला नेहमीच युरोपीय किंवा वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास शिकविण्यात आला. त्यात भारत हा केवळ शेती करणारा आणि परकी आक्रमणांचा वाट पाहणारा देश होता, असे चित्र मांडण्यात आले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पुणे: शालेय पाठ्यपुस्तकांमधून आपल्याला नेहमीच युरोपीय किंवा वसाहतवादी दृष्टिकोनातून इतिहास शिकविण्यात आला. त्यात भारत हा केवळ शेती करणारा आणि परकी आक्रमणांचा वाट पाहणारा देश होता, असे चित्र मांडण्यात आले. प्रत्यक्षात आपण प्राचीन काळी प्रमुख सागरी प्रवासी आणि व्यापारी होतो. आता त्यामुळेच भारतीय इतिहासाची मांडणी वसाहतवादी चौकटीतून मुक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांनी केले.

‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते. ‘वास्को-द-गामा याने भारताचा (India) सागरी मार्ग शोधला’, ही मांडणी अपुरी असल्याचे सांगत त्रिपाठी म्हणाले, ‘‘आफ्रिकेत त्याची भेट कांजी मलम या गुजराती खलाशाशी झाली आणि त्यानेच ‘वास्को-द-गामा’ला केरळपर्यंतचा मार्ग दाखविला. भारतीय लोक हे सुमारे दोन हजार वर्षांपासून हा सागरी मार्ग वापरत होते. मात्र हा सागरी व्यापार आणि नौकानयनाच्या परंपरेचा इतिहास शिकवला जात नाही,’’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘सकाळ लिट फेस्ट‘चा आज समारोप झाला. त्यापूर्वी दुपारी झालेल्या सत्रात अमिश त्रिपाठी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

त्रिपाठी यांची मांडणी

हस्तलिखिते: आपला देश केवळ मौखिक परंपरेचा होता आणि आपण नोंदी ठेवल्या नाहीत, हा ब्रिटिशांनी केलेला दावा खोटा आहे. आज युरोपची मातृसंस्कृती असलेल्या ग्रीकांचे केवळ २० ते ३० हजार हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, भारतामध्ये एक कोटींहून अधिक संस्कृत हस्तलिखिते उपलब्ध आहेत. भारतीय हस्तलिखिते केवळ धार्मिक वा आध्यात्मिक विषयांपुरती मर्यादित नाहीत; त्यात इतिहास, नौकानयन, विज्ञान आणि खगोलशास्त्रासारख्या विषयांचेही ज्ञान आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसारख्या संस्थांनी हा ठेवा जपण्याचे काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Speech: 'देशाची बदनामी करुन सत्तेत येता येणार नाही', अमित शहा यांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींच्या विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक

Goa Politics: कन्नडिगांची नजर गोवा विधानसभेवर! राजकीय सक्षमीकरणासाठी संघटित होण्याचे संदीप पाटीलांचे प्रतिपादन

Dayanand Mandrekar Resigns: स्‍वकियांच्या छळामुळेच महामंडळाचा राजीनामा दिला, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Birsa Munda Jayanti 2026: आज बलिदानाची नव्हे, तर परस्पर सहकार्याची गरज; बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सावंतांचे आवाहन

Daily Horoscope: धनलाभाचा दिवस! सूर्य गोचर आणि शुभ योगांमुळे 'या' राशींचे उजळणार नशीब; सोमवार ठरणार खास

SCROLL FOR NEXT