Sameer Amunekar
भारतीय संघानं 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळला.
1952 मध्ये चेन्नईत इंग्लंडला हरवून भारतानं पहिला कसोटी सामना जिंकला.
1968 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध, मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विजय मिळवला.
इंग्लंडमध्ये1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी मालिका जिंकली.
तीन कसोटी मालिकेत पहिले दोन सामने अनिर्णित, तिसरी कसोटी ‘द ओव्हल’वर भारतानं 4 विकेट्सने जिंकली.
पहिल्या डावात इंग्लंड 355, भारत 284; चंद्रशेखर यांच्या 6 विकेट्समुळे इंग्लंड दुसऱ्या डावात 101 धावांत बाद; भारताला 173 धावांचं लक्ष्य मिळालं होतं.
वाडेकर, सरदेसाई, विश्वनाथ, इंजिनियर यांच्या फलंदाजीच्या जोरावर लक्ष्य पूर्ण करत भारतानं विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या 21 पूर्वीच्या कसोट्यांमध्ये भारताला विजय नव्हता (14 पराभव, 7 अनिर्णित).