India Vs America Dainik Gomantak
देश

"आंतरराष्ट्रीय संबंधातही व्होट बँकेचे राजकारण...": US रिपोर्टची भारताने केली निंदा

आंतरराष्ट्रीय संबंधातही व्होट बँकेचे राजकारण करण्यात येत असल्याचे सांगत भारताने अल्पसंख्यांकांवरील अमेरिकेच्या अहवालाची निंदा केली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अहवालाचा भारताने निषेध नोंदवला आहे. भारताकडून सांगण्यात आले की, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही व्होट बँकेचे राजकारण दुर्दैवी आहे. (America report on minorities vote bank politics in international relations india slams)

दरम्यान, यूएस स्टेट डिपार्टमेंटने आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावर संसदेत सादर केलेल्या आपल्या वार्षिक अहवालात आरोप केला आहे की, 2021 मध्ये, भारतातील (India) अल्पसंख्याक समुदायांवर वर्षभर हल्ले झाले, ज्यात हत्या आणि धमकावणे देखील समाविष्ट आहे.

तसेच, स्टेट डिपार्टमेंटच्या 'फॉगी बॉटम' मुख्यालयात परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी अहवाल जारी केला. हा अहवाल जगभरातील धार्मिक स्वातंत्र्य आणि उल्लंघनांच्या स्थितीबद्दल आपला दृष्टीकोन दर्शवतो. प्रत्येक देशासाठी स्वतंत्र्यांची व्याख्या वेगवेगळी आहे. दुसरीकडे मात्र, भारताने अमेरिकेचा (America) हा अहवाल सपशेल नाकारला आहे. परदेशी सरकारांना आपल्या देशातील नागरिकांच्या (Citizens) घटनात्मक अधिकारांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे देखील भारताने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT