Anju Nasrullah Love Story Dainik Gomantak
देश

Anju-Nasrullah Love Story: तु दुसरं लग्न करणार आहेस का...? पाकिस्तानात गेलेल्या बायकोला त्यानं भावूक होत विचारलं!

Pakistan: राजस्थानमधील अलवरची रहिवासी असणारी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली आहे. खैबर पख्तूनख्वामधील नसरुल्लाहला भेटण्यासाठी अंजूने पाकिस्तान गाठले.

Manish Jadhav

Anju Nasrullah Love Story: देशभरात पाकिस्तानी महिला सीमा हैदरची लव्हस्टोरी चर्चेत आहे. प्रेमाखातर सीमा पाकिस्तान सोडून उत्तरप्रदेशातील सचिन मीनासाठी भारतात अवैधरित्या आली.

यातच आता राजस्थानमधील (Rajasthan) अलवरची रहिवासी असणारी अंजू भारतातून पाकिस्तानात गेली आहे. खैबर पख्तूनख्वामधील नसरुल्लाहला भेटण्यासाठी अंजूने पाकिस्तान गाठले.

दरम्यान, प्रेमापोटी पाकिस्तानात (Pakistan) गेलेल्या अंजूचे पती अरविंदसोबत फोनवर संभाषण झाले आहे. सुमारे 2 मिनिटे 40 सेकंदांच्या संभाषणात अंजू सातत्याने तिच्या पतीला तिची कागदपत्रे पोलिसांना देऊ नका असे सांगत आहे.

मीडियाला जास्त काही सांगू नका, असं ती वारंवार सांगत आहे. एवढेच नाही तर पतीने पाकिस्तानात लग्न केले आहे का, असे विचारले असता तिने असे काही केले नसल्याचे सांगितले.

अरविंदने फोनवरुन अंजूशी काय चर्चा झाली ते पाहा

पती: हॅलो, कशी आहेस.

अंजू : हा, हा डेव्हिड

पती: मी डेविड बोलत नाही.

अंजू : हा बोला

पती : कशी आहेस?

अंजू : ठीक आहे

पती: जेवण झालं का?

अंजू : हो

पती: इथं मी चिकन बनवलं आहे.

पती: कधीपर्यंत येणार आहे?

अंजू : येण्याचं सोडा, कोणी चौकशी करायला आलं तर माझी कागदपत्रे देऊ नका. लॉक करुन ठेवा. कोणी विचारलं तर त्यांना सांगा कागदपत्रे घेऊन गेली आहे.

अंजू : हॅलो! तुम्ही कागदपत्रे कुणाला दिली नाहीत ना?

पती: नाही, नाही...

अंजू : मग ठीक आहे, कुणी विचारले तर सांगा घरात नाहीयेत, ती घेऊन गेली आहे.

अंजू : यायला काय मी येऊन जाईन. येथे फॅमिली आहे.

पती: ठीक आहे! मीडियात काय चालले आहे?

अंजू : मीडिया तर चर्चा करेल ना, हे या लोकांचं कामचं आहे. मला मीडियावाल्यांकडूनही फोन येत आहेत. मी त्यांच्याशी चॅटवर बोलत आहे. तुम्ही फक्त माझी कागदपत्रे कुणाला देऊ नका.

मी मीडियाच्या लोकांना सांगितले आहे की, तुम्ही कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी त्यांच्याशी बोलत नाही, म्हणून ते तुमच्याकडे येतील. सध्या मी मीडियावाल्यांशी चॅटवर बोलत आहे. अजून काही असेल तर सांगा?

पती: बरं, तु तिकडं लग्न करणार आहेस का?

अंजू : तसं काही नाही, उद्या बोलूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT