Allahabad HC Dainik Gomantak
देश

अलाहाबाद HC चा मोठा निर्णय, लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेला ठोठावला पाच हजारांचा दंड

Allahabad HC: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची शुक्रवारी जोरदार चर्चा झाली.

दैनिक गोमन्तक

UP News: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. विवाहित महिला दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यासंबंधी न्यायालयाचा निर्णय आला आहे. ज्यामध्ये न्यायालयाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याचवेळी न्यायालयाने त्यांना विनाकारण संरक्षण देण्यासही नकार दिला आहे.

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) या प्रकरणावर सुनावणी करताना म्हटले आहे की, 'ही याचिका बेकायदेशीर संबंधांवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब करण्याशिवाय दुसरे काही नाही.' न्यायालयाने याचिकाकर्त्या महिला (Women) आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. याचिकाकर्त्या सुनीता देवी यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायालयाने म्हटले होते की, 'देश संविधानाने चालतो.'

न्यायालयाने परवानगी दिली नाही

न्यायालयाने म्हटले की, 'लिव्ह-इनला परवानगी आहे, परंतु याचिकाकर्ते हे पती-पत्नी आहेत असे म्हणता येणार नाही. विविध सामाजिक नीतिनियमांच्या विरोधात जाऊन ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. तथापि, न्यायालय समान लिंगाच्या लोकांसोबत राहण्याचा अधिकार मानते. परंतु भारतीय समाज लिव्ह-इन स्वीकारत नाही. त्यामुळे न्यायालय बेकायदेशीरतेला परवानगी देऊ शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT