Pune Cricket Dainik Gomantak
देश

Pune Cricket: पुण्यात रंगणार ‘ऑल इंडिया ४०+’ क्रिकेटचा थरार! नोव्हेंबरमध्ये आयोजन, देशभरातील 32 संघ अन्‌ 7 लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव

All India 40 Plus Senior Cricket League: ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘४०+ पुणे क्रिकेट संस्था’ यांच्यातर्फे पुण्यात ऑल इंडिया ४०+ एससीएल (सिनिअर क्रिकेट लीग) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पुणे: ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘४०+ पुणे क्रिकेट संस्था’ यांच्यातर्फे पुण्यात ऑल इंडिया ४०+ एससीएल (सिनिअर क्रिकेट लीग) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४० वर्षांवरील अनुभवी क्रिकेटपटूंना एकाच व्यासपीठावर खेळण्याची संधी देणारी ही स्पर्धा यंदा अधिक भव्य स्वरूपात नोव्हेंबरमध्ये होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील खेळाडू यात सहभागी होणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जात असून तिला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी दिल्ली, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित ४०+ क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात मुंबईच्या वन सोल्यूशन संघाने विजेतेपद पटकावले होते, तर चाकण (पुणे) येथील पी.व्ही.एन. इलेक्ट्रोमेक संघ उपविजेता ठरला होता.

संघमालक म्हणून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ६३ हजार रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. उद्योगपती, व्यावसायिक, क्रिकेटप्रेमी आणि संस्थांना संघमालक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेता आणि अव्वल चार संघांसाठी एकूण सात लाख रुपयांची रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आयोजकांकडून क्रिकेट किट दिले जाणार आहे. दर्जेदार मैदान, नियोजनबद्ध आयोजन, व्यावसायिक व्यवस्थापन आणि अनुभवी खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा ४०+ क्रिकेटमधील एक प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. देशभरातील इच्छुक खेळाडू आणि संघमालकांनी या स्पर्धेसाठी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राहुल साठे (४०+ पुणे क्रिकेट संस्था) ८८३००६०७०३ यांच्याशी संपर्क साधावा.

यंदा खेळाडूंची लिलाव पद्धतीने निवड

यंदाच्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) पद्धतीने निवड होणार आहे. देशभरातून नोंदणी करणाऱ्या खेळाडूंचा लिलाव करून त्यांना ३२ संघांमध्ये विभागले जाणार आहे. प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील. सर्व सामने नॉकआऊट पद्धतीने खेळवले जाणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम लागू राहतील. त्यामुळे स्पर्धेला व्यावसायिक दर्जा मिळणार आहे.

स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे

विजेता संघ : ३ लाख रुपये उपविजेता संघ : २ लाख रुपये

तृतीय क्रमांक : १ लाख रुपये चतुर्थ क्रमांक : १ लाख रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT