Video Viral Dainik Gomantak
देश

Video Viral: चालत्या गाडीच्या छतावर 'दारु पार्टी', ओव्हरफ्लो जामचा व्हिडिओ व्हायरल!

Drink In Traffic On Car Roof: दरम्यान, गुरुग्राममधून असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे एक व्यक्ती कारच्या छतावर खुलेआम दारु पीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Drink In Traffic On Car Roof: दोनच दिवसांपूर्वी, ग्रेटर नोएडा येथून एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये दोन मुलांनी कारवर असा स्टंट केला होता, जो कदाचित त्यांच्या जीवासाठी घातक होता. मात्र याप्रकरणी पोलिसांची कोणतीही कारवाई समोर आली नाही. दरम्यान, गुरुग्राममधून असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे एक व्यक्ती कारच्या छतावर खुलेआम दारु पीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरुग्राममधून हा व्हिडीओ समोर आला

वास्तविक, एका यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, हे फक्त गुरुग्राममध्येच घडू शकते, काही वाहने ट्रॅफिकमध्ये अडकून हळू हळू पुढे जात असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, एक मुलगा गाडीच्या छतावर बसला आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो तिथे दारु पितोय.

वाहनही संथ गतीने जात आहे

त्याच्या समोर एक ग्लास ठेवण्यात आला असून त्या ग्लासमध्ये दारुसारखे काहीतरी ठेवलेले दिसत आहे. ते वाहनही संथ गतीने जात आहे आणि त्याच्या पुढे बरीच रहदारी दिसत आहे. ती व्यक्ती पोलिसांना (Police) खुलेआम आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. त्याला पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होतात. दरम्यान, कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला.

हा व्हिडिओ व्हायरल झाला

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. यावर पोलिसांनी काय कारवाई केली आणि ती खरोखरच दारु होती का, याबाबत सध्या तरी दुजोरा मिळालेला नाही. पण त्याच्याकडे बघून त्याच्या ग्लासात वाईनसारखे काहीतरी असल्याचे जाणवते. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

SCROLL FOR NEXT