Sri Satya Sai Baba centenary Dainik Gomantak
देश

पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

Aishwarya touches PM Modi feet: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला हजेरी लावून लक्ष वेधले.

Akshata Chhatre

Aishwarya Rai viral video: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला हजेरी लावून लक्ष वेधले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते, यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला, आणि सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या चरणांना स्पर्श

बुधवारी (दि. १९) झालेल्या या कार्यक्रमादरम्यान, स्टेजवर जाण्यापूर्वी 'पोन्नियन सेल्वन' स्टार ऐश्वर्या राय बच्चन हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणांना स्पर्श करताना पाहिले गेले. ही घटना इंटरनेटवर तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तत्काळ चर्चेचा विषय बनली.

ऐश्वर्याचे एकता आणि प्रेमावर भाषण

ऐश्वर्या राय बच्चन हिने नंतर जात, धर्म आणि प्रेम या विषयांवर केंद्रित भाषण केले. समाजात ऐक्य निर्माण करण्याची गरज आहे, यावर जोर देत तिने लोकांना सामाजिक भेदभावाच्या पलीकडे जाऊन करुणा आणि माणुसकी स्वीकारण्याचे आवाहन केले. ऐश्वर्याचा संदेश श्री सत्य साईबाबा यांच्या शिकवणीशी जवळचा होता, जे आजही भारत आणि जगभरात एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जातात.

श्री सत्य साईबाबांची शिकवण

२३ नोव्हेंबर १९२६ रोजी जन्मलेले श्री सत्य साईबाबा निस्वार्थ सेवा, सलोखा आणि अध्यात्मिक वाढीचा पुरस्कार करण्यासाठी जगभर ओळखले जात होते. त्यांचे वारसा लाखो अनुयायांकडून जपला जात असून, त्यांच्या कार्यापासून प्रेरित धर्मादाय उपक्रम आणि शैक्षणिक संस्थांमार्फत तो आजही सुरू आहे. त्यांचे २४ एप्रिल २०११ रोजी, ८४ व्या वर्षी निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

SCROLL FOR NEXT