देश

Air India Plane Crash: मोठी बातमी! एअर इंडिया विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबाद येथून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळून गुरुवारी (१२ जून) मोठा अपघात झाला. विमानातून 242 प्रवासी प्रवास करत होते. विमानतळावरुन टेकऑफनंतर अवघ्या 5 मिनिटांतच हे विमान मेघानीनगर हॉर्स कॅम्प परिसरात कोसळले.

Manish Jadhav

अहमदाबादमधील विमान अपघाताच्या घटनेबद्दल दुःखद बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील कोणीही वाचले नाही. अहमदाबादच्या आयुक्तांनी सांगितले की, विमानातील सर्व 242 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 242 जण होते, ज्यात पायलट आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.

विमान अहमदाबादहून लंडनला जात होते

दरम्यान, एअर इंडियाचे विमान AI171 ला अपघात झाला, जे अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात होते. हे विमान बोईंग B787 विमान VT-ANB होते. अपघाताची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील अहमदाबादला रवाना झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरातचे मुख्यमंत्री आणि अहमदाबाद आयुक्तांशी फोनवरुन संपर्क साधून त्यांच्याकडून परिस्थितीबाबत विचारपूस केली होती.

विमान उड्डाण करताच अपघात झाला

एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नुसार, एअर इंडियाच्या एआय-171 या विमानाने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:39 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरुन उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या हद्दीबाहेर जमिनीवर कोसळले. अहमदाबादमधील मेघनगर आयजीपी कॉम्प्लेक्समध्ये हे विमान कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात 242 लोक होते, ज्यात केबिन क्रूच्या 10 सदस्यांचा समावेश होता.

विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल होते, ज्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. अपघातानंतर अपघातस्थळाभोवतीचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. अग्निशमन दलासह बचाव पथकांना बचाव आणि मदत कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले. याशिवाय, रुग्णालयात सुमारे 1200 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT