पुणे: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स २८ तासांतच तपास पथकांना आढळून आला. देशातील एकमेव दिल्ली येथील विमान अपघात तपास संस्थेच्या (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो) ताब्यात हा ब्लॅक बॉक्स असून तेथे त्याची तपासणी होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते अपघाताचे प्राथमिक कारण एक महिन्यात समजेल. मात्र अंतिम अहवाल येण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी अशा अहवालासाठी वर्षभर वाट पाहावी लागत होती.
पूर्वी विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सचा तपास अमेरिका, फ्रान्स किंवा ब्रिटनच्या प्रयोगशाळांमध्ये होत होता, आता मात्र देशातच आधुनिक प्रयोगशाळा सुरू झाली आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण समजण्यास पूर्वीइतका उशीर होणार नाही. भारताने हवाई अपघाताच्या तपासात ऐतिहासिक पाऊल टाकत ब्लॅक बॉक्सचे एफडीआर व सीव्हीआर विश्लेषणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन केली.
विमान अपघात तपास संस्थेमार्फत दिल्लीतील सफदरजंग विमानतळ परिसरात ही प्रयोगशाळा कार्यरत आहे. त्यामुळे आता देशातील विमान अपघातानंतर फ्लाइट डेटा आणि कॉकपिट संवादाचे विश्लेषण परदेशात पाठविण्याची आवश्यकता नाही.
ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर व कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील माहिती सखोल विश्लेषण करून अंतिम अहवाल देणार
फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने संबंधित विमानाचा उड्डाणाचा वेग, उंची, इंजिन कार्य, स्वयंचलित प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींचा तपशील मिळणार
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून वैमानिक आणि सह वैमानिक यांच्यातील संभाषण, अलार्म्स आणि कॉकपिटमधील आवाजांचे विश्लेषण केले जाणार
एएआयबी ही संस्था देशातील विमान अपघातांची चौकशी करते
आयकाव (आयसीएओ) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही संस्था काम करते
पूर्णतः निष्पक्ष, स्वतंत्र आणि वैज्ञानिक पद्धतीने कामकाज
अपघाताच्या ठिकाणचे फोटो, व्हिडिओ, साक्षीदारांची माहिती गोळा केली जाते
संबंधित विमानाचे इंजिन, फ्लॅप्स, हायड्रॉलिक, इंधन व्यवस्था तपासली जाते
एटीसीचे रेकॉर्डिंग, पायलटचे ट्रेनिंग, मेंटेनन्स रेकॉर्ड्सची तपासणी
वैमानिक आणि क्रूच्या वैद्यकीय स्थितीची चौकशी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.