Ahmedabad Plane Crash Dainik Gomantak
देश

Ahmedabad Plane Crash: विमान कोसळलं, 265 जणांचा मृत्यू… पण भगवद्गीतेचं पुस्तक पूर्णपणे सुरक्षित

Air India Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातामध्ये २६५ जणांना जीव गमवावा लागला.

Sameer Amunekar

गांधीनगर: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातामध्ये २६५ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेच्या ठिकाणी सापडलेली एक गोष्ट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये भगवद्गीतेचं पुस्तक पूर्णपणे सुरक्षित स्थितीत आढळून आलं आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमान अपघाताच्या अवशेषांमधून सापडलेलं भगवद्गीतेचं पुस्तक दाखवत आहे. भगवद्गीतेचं पुस्तक पूर्णपणे सुरक्षित स्थितीत आढळल्यामुळे हे दृश्य अनेकांना भावनिक करत आहे. या घटनेमुळे धार्मिक व आध्यात्मिक लोकांमध्ये एक प्रकारची श्रद्धा आणि आश्चर्य निर्माण झालं आहे.

२४२ प्रवाशांसह असलेले बोईंग ७८७-८ हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. या दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी, विश्वास कुमार रमेश (सीट ११A) जिवंत वाचला. तो आपत्कालीन एक्झिटजवळ बसला होता आणि अपघातानंतर धावून सुटण्यात यशस्वी ठरला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय वसतिगृहावर कोसळल्याने, वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, तर ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यामध्ये कित्येकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या घटनेची चौकशी करत असून, प्राथमिक अहवालानुसार सध्या बोईंग ७८७-८ या प्रकारात कोणतीही सुरक्षा तांत्रिक अडचण असल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी स्पष्ट केले.

या अपघातात ५३ प्रवासी युनायटेड किंगडमचे नागरिक होते. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी ब्रिटिश प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आणि सरकारला तातडीने हालचाली करण्याचे आवाहन केलं होतं.

ब्रिटिश प्रवासी फिओंगल आणि जेमी ग्रीनलॉ-मीक यांनी विमानात चढण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात त्यांनी भारतभेटीबद्दल आनंदाने अनुभव सांगितले होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे व्हिडिओ सध्या भावनिक आठवणी म्हणून पाहिले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT