Agra Police have shut down 9 online gaming apps, 6,000 rented bank accounts and 27 websites involved in Cyber fraud amounting 38k Crore. Dainik Gomantak
देश

38 हजार कोटी, 15 लाख लोक आणि 6 हजार बँक अकाउंट्स; देशातील सर्वात मोठ्या सायबर फ्रॉडची इनसाइड स्टोरी

Cyber Crime: 15 लाख भारतीय लोक सायबर चोरट्यांचे टार्गेट होते. यातून सायबर चोरट्यांची 38 हजार कोटी रुपये कमावण्याची तयारी होती. मात्र पोलिसांना एका धागा सापडला आणि यामुळे 15 लाख भारतीयांचे 38 हजार कोटी रुपये वाचले.

Ashutosh Masgaunde

Agra Police have shut down 9 online gaming apps, 6,000 rented bank accounts and 27 websites involved in Cyber fraud amounting 38k Crore:

आग्रा पोलिसांनी ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. 15 लाख भारतीय लोक सायबर चोरट्यांचे टार्गेट होते. यातून सायबर चोरट्यांची 38 हजार कोटी रुपये कमावण्याची तयारी होती.

त्यांनी एवढी मोठी रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून परदेशात हस्तांतरित करण्याची योजना आखली होती. मात्र त्यापूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांच्या सायबर पथकाने त्यांचा हा डाव उधळत सर्वात मोठी कारवाई आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 15 लाख लोकांची फसवणूक होणार होती. एफआयआरनंतर पोलिसांनी ही फसवणूक होण्यापासून रोखली आहे.

देश-विदेशात बसलेले सायबर चोरटे 15 लाख लोकांची 38 हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कसून चौकशी केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी 9 ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्स, भाड्याने घेतलेली 6 हजार बँक खाती आणि 27 वेबसाइट बंद केल्या आहेत.

चीन, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स

शहागंज पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा एका खासगी कंपनीने दाखल केला होता. सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, जे समोर आले ते पाहून पोलीस चक्रावून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे बेकायदेशीर सट्टेबाजी, गेमिंग, लाइव्ह कंटेंटचे लाईव्ह री-स्ट्रीमिंग, लाइव्ह गेम्स, थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि वेब पोर्टलद्वारे चीन, व्हिएतनाम, फिलीपिन्स आदी देशांतील सर्व्हरद्वारे बँकांमध्ये खाती उघडणे असे प्रकार करत होते.

दररोज 80 ते 100 कोटी रुपयांची कमाई

पोलिसांनी या प्रकरणाचा तब्बल 4 महिने तपास केला, त्यानंतर त्यांनी संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला. सायबर टीमने केंद्र आणि राज्य एजन्सीच्या मदतीने 27 गेमिंग वेबसाइट आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये उघडलेली 6 हजार खाती बंद केली.

पोलिसांचे म्हणणे आहे की चीन, रशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्समधील गुन्हेगार OTT प्लॅटफॉर्मवरून डेटा चोरत होते आणि बनावट अ‍ॅप्सवर लोकांना बेटींग करायला लावत होते. ते दररोज 80 ते 100 कोटी रुपये कमवत होते.

चीनमध्ये जाणारा पैसा रोखला

पोलिसांनी सांगितले की, "जे लोक परदेशात बसून फसवणूक करतात, ते क्रिप्टोकरन्सी आणि अशा इतर चलनांद्वारे ही रक्कम त्यांच्या खात्यात हस्तांतरित करतात.

या रकमेचा मोठा भाग चीनमध्ये जातो. त्यानंतर थायलंड, व्हिएतनाम आणि इतर अनेक देशांमध्ये जातो. रक्कम देखील हस्तांतरित केली जाते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

Rohit Sharma: फायनलचा थरार... भारतीय महिला संघाला सपोर्ट करण्यासाठी 'मुंबईचा राजा' मैदानात Watch Video

SCROLL FOR NEXT