Agniveer new rules pension and government job benefits for martyr families Dainik Gomantak
देश

Agniveer Rules Change: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Agniveer Pension And Job Scheme Updates: अग्निपथ योजनेंतर्गत देशाची सेवा करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकार लवकरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

Manish Jadhav

Agniveer Pension And Job Scheme Updates: अग्निपथ योजनेंतर्गत देशाची सेवा करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकार लवकरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या योजनेवर सध्या वेगाने काम सुरु असून, अंतिम मंजुरीनंतर ती देशभरात लागू केली जाईल. लष्कर, वायुसेना आणि नौदलात सेवा बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या म्हणजेच शहीद होणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबांना या योजनेचा थेट आणि मोठा फायदा होणार आहे.

देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या या तरुण जवानांना नियमित सैनिकांप्रमाणेच 'शहीद' दर्जा देऊन सन्मानित करणे आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाला पेन्शन (Pension) किंवा शासकीय नोकरी देण्याची तरतूद या प्रस्तावात करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल.

सध्याच्या नियमांनुसार, चार वर्षांच्या कार्यकाळात कर्तव्य बजावताना अग्निवीराला वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबाला केवळ विम्याची रक्कम मिळते. दोन वेगवेगळ्या योजनांतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतचा हा विमा दिला जातो. मात्र, नियमित सैनिकांप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला इतर कोणतीही पेन्शन, नोकरी किंवा सवलती मिळत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण शिफारस केली.

देशासाठी बलिदान देणारे अग्निवीरही नियमित सैनिकांप्रमाणेच मातृभूमीचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही तेवढाच सन्मान, पेन्शन आणि नोकरीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, जेणेकरुन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होऊ शकेल, असे समितीने म्हटले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्रालय या शिफारशीबाबत अत्यंत सकारात्मक असून, लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अग्निपथ योजनेला आता जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली असून, जवानांची पहिली बॅच लवकरच निवृत्त होणार आहे. सद्यस्थितीत तिन्ही दलांमध्ये मिळून सुमारे दीड लाख अग्निवीर कार्यरत आहेत, ज्यामध्ये एकट्या भूदलात 1.25 लाख जवान आहेत. दरवर्षी 45 ते 50 हजार नव्या अग्निवीरांची भरती केली जाते. आतापर्यंत कर्तव्यावर असताना साधारण 25 अग्निवीरांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. या नव्या नियमामुळे भविष्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या अग्निवीरांच्या वारसांना मोठा सामाजिक आणि आर्थिक आधार मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT