After Rahul Gandhi, now the Twitter accounts of many big Congress leaders have been suspended Dainik Gomantak
देश

राहुल गांधी नंतर आता काँगेसच्या अनेक बड्या नेत्यांचे Twitter अकाऊंट निलंबित

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित (Twitter Account Blocks) करण्यात आले होते

दैनिक गोमन्तक

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित (Twitter Account Blocks) करण्यात आले होते आणि आता काँग्रेसचे अनेक नेते आणि काँगेस पक्षाचे (Congress Party) अधिकृत अकाऊंटही निलंबित करण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने सरकारवर केला आहे. ट्विटरने आता मायक्रोब्लॉगिंग साइटच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) चे अधिकृत हँडल ब्लॉक केले आहे.काँग्रेसने आरोप केला आहे की रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या खात्यांवर अशीच कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे खातेही लॉक करण्यात आले आहे. यासाठी काँग्रेसने ट्विटरवर सरकारच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे सचेतक माणिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव या साऱ्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहेत.

काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी यावेळी सरकारवर गंभीर आरोप करत ट्विटर सरकारच्या दबावाखाली काम करत असून सरकारने आमच्या नेते आणि कार्यकर्त्यांचेही जवळपास 5,000 अकाऊंट आधीच ब्लॉक केले आहेत. पण सरकारला त्यांना हे समजले पाहिजे की ट्विटर आणि सरकार दोघेही आमच्यावर दबाव आणू शकणार नाहीत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत बलात्कार आणि हत्या झालेल्या मुलीच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केले होते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) राहुल गांधींच्या ट्विटची दखल घेतली आणि ट्विटरने अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल राहुल गांधी यांच्या अकाऊंटवर निलंबनाची कारवाई करण्यात अली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT