नवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा (इस्रो) पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'EOS-03' गुरुवारी सकाळी प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या चाचणी स्थळावरून प्रक्षेपित करण्यात आला. परंतु, प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात, इस्रोचे प्रमुख के शिवन (ISRO chief K Sivan) यांनी सांगितले की, क्रायोजेनिक अवस्थेत तांत्रिक बिघाडामुळे इस्रोचे GSLV-F10 /EOS-03 मिशन पूर्ण होऊ शकले नाही (The mission could not be completed). दरम्यान, स्पेसफ्लाइट नुसार, इस्रोने स्पष्ट केले आहे की, जीएसएलव्ही एमके 2 लाँचच्या 'क्रायोजेनिक स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड' झाल्यामुळे ते अयशस्वी झाले आहे. 2017 नंतर भारतीय प्रक्षेपणातील हे पहिले अपयश असल्याचे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे. इस्रोने म्हणले की, उपग्रहाचा संपूर्ण प्रवास 18.39 मिनिटांचा होता परंतु शेवटच्या क्षणी क्रायोनिक स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याच्याकडून डेटा मिळणे बंद झाले. इस्रो प्रमुखांना माहिती दिल्यानंतर सांगण्यात आले EOS-3 मिशन अंशतः अपयशी ठरले आहे.
पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS) चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते वारंवार अंतराने मोठ्या क्षेत्राची रिअल-टाइम छायाचित्रे पाठविणार होते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींवर तसेच कोणत्याही अल्पकालीन संकट किंवा घटनांवर देखरेख करण्यास मदत झाली असती. या उपग्रहाचा उपयोग कृषी, पर्यवरण, पाणी तसेच नैसर्गीक आपत्तीची चेतावणी, चक्रीवादळची देखरेख, ढगफुटी किंवा ढगांच्या गडगडाटीसह जोरदार पाऊस, वादळ याची पूर्व कल्पना आपल्याला मिळणार होती. या व्यतीरिक्त हे विविध क्षेत्रात काम करते आणि महत्वाची माहिती आपल्याला पुरविते.
देश आणि त्याच्या सीमांची छायाचित्रे आपल्याला मिळतात
GSLV (जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल)-F10 द्वारे हे जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येणार होते. त्यानंतर उपग्रह त्याच्या ऑन-बोर्ड प्रपोशनल सिस्टमचा वापर करून जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पोहोचला असता. हा उपग्रह 10 वर्षे आपल्याला सेवा देऊ शकला असता.
हा उपग्रह देश आणि त्याच्या सीमेवरील रिअल-टाइम छायाचित्रे आपल्याला देऊ शकतो, आणि नैसर्गिक आपत्तींचे लवकर निरीक्षण करण्यास मदत करतो. इस्रोने म्हटले होते, 'अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस -03 जीएसएलव्ही-एफ 10 द्वारे जीटीओमध्ये ठेवला जाईल. त्यानंतर, उपग्रह त्याच्या प्रपोशनल सिस्टीमचा वापर करून अंतिम कक्षेत पोहोचेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.