Amarnath Yatra 2022 News Dainik Gomantak
देश

3 वर्षानंतर अमरनाथ यात्रा सुरू, यात्रेकरूंची पहिली तुकडी मंदिराकडे रवाना

उपायुक्त पियुष सिंगला यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील नुनवान बेस कॅम्प येथून यात्रेकरूंच्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.

दैनिक गोमन्तक

नुनवान: नुनवान बेस कॅम्पमधून 2,750 यात्रेकरूंचा जत्था दक्षिण काश्मीर हिमालयातील मंदिराकडे रवाना झाल्यामुळे वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. उपायुक्त पियुष सिंगला यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील नुनवान बेस कॅम्प येथून यात्रेकरूंच्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. सिंगला यांनी 43 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. (Amarnath Yatra 2022 Updates)

ते म्हणाले, “यात्रेकरूंना सुरक्षित वाटावे आणि मंदिराच्या पवित्र गुहेतील शिवलिंगाचे शांततेने दर्शन घेता यावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे.” जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बुधवारी जम्मू शहरातील भगवती नगर बेस कॅम्पला भेट दिली. त्यावेळी वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी 4,890 यात्रेकरूंची पहिली तुकडी काश्मीरच्या पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पसाठी रवाना झाली होती.

श्री अमरनाथ श्राइन बोर्ड (SASB) ने नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था देखील केली आहे. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीनंतर यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने यावर्षी यात्रेकरूंची संख्या नेहमीपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या घटनेतील कलम 370 मधील बहुतांश तरतुदी रद्द केल्यानंतर ही यात्रा मध्यंतरी पुढे ढकलण्यात आली होती, तर 2020 आणि 2021 मध्ये कोविड-19 जागतिक साथीच्या आजारामुळे यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यंदा परिस्थितीत सुरळीत असल्याने अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT