Sunil Pal, Mushtaq Khan Abduction Case Dainik Gomantak
देश

Sunil Pal, Mushtaq Khan case: उँची दारुचे शौकीन, गोव्यात पार्टी; Actor सुनील पाल, मुश्ताक खान अपहरणकर्त्या आरोपींबाबत मोठा खुलासा

Sunil Pal, Mushtaq Khan Abduction Case: चित्रपट अभिनेते मुश्ताक खान आणि सुनील पाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

Pramod Yadav

Sunil Pal, Mushtaq Khan Abduction Case

बिजनौर, उत्तर प्रदेश: चित्रपट कलाकारांचे अपहरण करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा म्होरक्या लवी उर्फ ​​सुशांतला ऐशोआरामात जीवन जगण्याची सवय आहे. लोकांना व्याजावर पैसे देण्याबरोबरच त्याने खंडणी वसुलीच्या काळ्या धंद्यातही उडी घेतली. लवीने महागडी दारू आणि फिरण्यावर खूप पैसा खर्च केला. विशेषत: गुन्हे केल्यानंतर तो गोव्याला भेट द्यायचा. सध्या पोलीस त्याच्या मागावर असून उत्तराखंड ते दिल्लीपर्यंत छापे टाकले जात आहेत.

सोमवारी, सीओ सिटी संग्राम सिंह यांच्या नेतृत्वाखाली, मुश्ताक खान अपहरण प्रकरणात फरार असलेल्या लवी पाल उर्फ ​​सुशांतसह पाच आरोपींना पकडण्यासाठी अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिस दलाने छापे टाकले.

बिजनौर येथील एक टोळी गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट कलाकारांचे अपहरण करून खंडणी वसूल करत होती. दरम्यान, चित्रपट अभिनेते मुश्ताक खान आणि सुनील पाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आलीय तर लवी उर्फ ​​सुशांतसह अनेकजण फरार आहेत. आरोपी थांबले असण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. उत्तराखंड आणि दिल्लीलाही पथके पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

चित्रपट कलाकारांचे अपहरण आणि खंडणी वसुली प्रकरणाची तार आता राजा का ताजपूर भागाशीही जोडली जात आहे. वास्तविक, ज्या क्रमांकावरून कलाकारांना कॉल करण्यात आले होते, ते सिम बनावट आयडीवर घेण्यात आले होते. जे टोळीचा म्होरक्या लवी पाल याने पाच हजार रुपयांना विकत घेतले होते. सिम विक्रेता सध्या मेरठ पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब अहमदने एक सिम विकले होते, जे अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लवी पाल वापरत असे. या सिमवरून कलाकारांना फोन करून बुकिंग करण्यात आले. हे सिम अजीम नावाच्या तरुणाच्या आयडीवरून जारी करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT