Pramod Yadav
पश्चिम घाटात असलेले हे अभयारण्य जैवविविधता अनुभवण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे बिबट्या, हरीण आणि विविध पक्षी पाहता येतील. येथून दुधसागरचा व्ह्यू देखील पाहता येईल.
भगवान महावीर अभ्यारण्यातच मोले राष्ट्रीय उद्यान आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारची फुलपाखरे पाहता येतील. पक्षीप्रेमींसाठी ही खास जागा आहे.
बोंडला अभयारण्यात बोटॉनिकल गार्डनसह लहान झू देखील आहे. येथे हरीण, भारतीय गवा आणि विविध प्रकारची माकडं पाहता येतील.
खोतीगाव वन्यजीव अभयारण्यात चारशिंगी सांभर, उडणाऱ्या खारी, खवले मांजर आणि इतर प्राणी पाहता येतील. शिवाय विविध प्रकारणी फुलांचाही आस्वाद घेता येईल.
म्हादई वन्यजीव अभयारण्यात काळ्या रंगाचा चित्ता (Black Panther) यासह विविध प्राणी पाहता येतील. याशिवाय या परिसरात नानाविध पक्षांचे दर्शन होईल.
चोडण बेटावर असलेल्या सलीम अली बर्ड सँचुरीत फेरफटका मारुन वेगळ्या नैसर्गिक सफारीचा आनंद घेता येईल.
दक्षिण गोव्यातील या अभयारण्यात बिबट्यांचे दर्शन होईल. याशिवाय खारुताई, फुलपाखरांचेही दर्शन होईल. हा भाग हिरव्या गार वनराईने नटलेला आहे.
खोतीगावातील कुस्के धबधबा अनेकांना अपरिचित असलेला धबधबा आहे. नेत्रावळीला आल्यानंतर कुस्के धबधब्याला नक्की भेट द्या.