Crime News Dainik Gomantak
देश

Delhi Acid Attack: दिल्ली पुन्हा हादरली! 17 वर्षीय मुलीवर फेकले अ‍ॅसिड...

कॉलेजला जात असतानाची घटना; तिघे ताब्यात, दोघे आरोपी अल्पवयीन

Akshay Nirmale

Delhi Acid Attack: पश्चिम दिल्लीतील उत्तम नगर परिसरातील मोहन गार्डन येथे 17 वर्षीय मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलगी लहान बहिणीसोबत कॉलेजला जात असताना हा प्रकार घडला आहे. मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी या मुलीवर अॅसिड फेकले. या घटनेने देशाची राजधानी दिल्ली पुन्हा हादरली आहे. दिल्लीत महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून सर्वस्तरातून दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

सकाळी 7.32 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले आहे. इयत्ता 12 वीत शिकणारी ही 17 वर्षीय विद्यार्थिनी तिच्या लहान बहिणीसोबत कॉलेजला चालली होती. मोहन गार्डन येथील घरातून ती बाहेर पडली. घरापासून अवघ्या काही अंतरावर आल्यावर दुचाकीवरून दोन मुले त्यांच्या दिशेने आली आणि मागे बसलेल्या मुलाने मोठ्या बहिणीच्या चेहऱ्यावर बाटलीतून अॅसिड फेकले. संबंधित मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या वडीलांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी मुलीने कधीही छेडछाड किंवा इतर कुणी त्रास देत असल्याबाबत घरात कधीही सांगितले नव्हते. या घटनेबाबत बोलताना डीसीपी हर्षवर्धन म्हणाले, संशयाच्या आधारे पोलिसांनी तीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मोहन गार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

दोन संशयित आरोपी पीडित मुलीच्या घराजवळ राहतात. ही मुलगी शाळेत कुठल्या मार्गाने जाते याची आरोपींनी आधीच रेकी केली होती. अद्याप मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. अन्य आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT