Court  Dainik Gomantak
देश

''तुला 5 रुपये आणि कुरकुरे देईन…'', खून लपवण्यासाठी मुलाला आमिष देणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मुलाच्या जबाबवरुन सावत्र पित्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, सावत्र पित्याने खून लपवण्यासाठी मुलाला 5 रुपये आणि कुरकुरे देण्याचे आमिष दिले होते, मात्र असे असतानाही मुलाने आईच्या मारेकऱ्याला शिक्षा दिली.

दरम्यान, कानपूर येथील रहिवासी सलीम अन्सारी यांनी 4 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता, ज्यात आरोप केला होता की, त्यांचा भाडेकरु नमरुने त्याची पत्नी नसरा हिची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या काही दिवसांनी नमरुला अटक केली. तपासादरम्यान असे समोर आले की, नसराला दोन मुले होती. पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने नमरुसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र नमरु नसराला रोज मारहाण करायचा. दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे.

5 रुपये आणि कुरकुरे देण्याचे आमिष

दरम्यान, घटनेच्या दिवशीही नमरु आणि नसरा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. नमरुने तिची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. घटनेच्या वेळी नसराचा 7 वर्षांचा मुलगाही तिथे उपस्थित होता. खून लपवण्यासाठी नमरुने त्याला 5 रुपये आणि कुरकुरेचे आमिष दिले होते. या हत्येबाबत कोणालाही सांगू नको, अशी धमकी त्याने त्याला दिली होती.

मुलाने साक्ष दिली

पण घडले उलटेच. सरकारी वकील अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, मुलाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयात आपला जबाब नोंदवला. त्याने न घाबरता स्पष्टपणे सांगितले की, त्याच्या सावत्र पित्याने त्याच्या आईची हत्या केली. मुलगा आणि इतर लोकांच्या साक्षीच्या आधारे कीर्ती कुणाल यांच्या न्यायालयाने नमरुला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

SCROLL FOR NEXT