Manish Sisodia Dainik Gomantak
देश

20 लाख नोकऱ्या देण्याचे 'आप'चे आश्वासन; दिल्लीचा अर्थसंकल्प सादर

यावेळी आमचा अर्थसंकल्प रोजगाराचा अर्थसंकल्प आहे: मनीष सिसोदिया

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आज विधानसभेत दिल्लीचा अर्थसंकल्प (दिल्ली बजेट 2022-23) सादर करत आहेत. मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्लीच्या अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे. मनीष सिसोदिया दिल्लीच्या बजेटचा लाल टॅब घेऊन विधानसभेत पोहोचले.

नाव रोजगार बजेट, 20 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य
अर्थसंकल्प सादर करताना मनीष सिसोदिया म्हणाले की, गेल्या वर्षी आम आदमी पार्टी (AAP) सरकारने देशभक्तीपर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी आमचा अर्थसंकल्प रोजगाराचा अर्थसंकल्प आहे. येत्या पाच वर्षांत दिल्लीतील लोकांना 20 लाख नोकऱ्या देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

ते पुढे म्हणाले, आम्ही सादर करत असलेला हा 8वा अर्थसंकल्प आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या 7 बजेटमुळे दिल्लीतील शाळा सुधारल्या आहेत, वीज उपलब्ध झाली आहे, लोकांना शून्य वीज बिल येत आहे, मेट्रोचा विस्तार झाला आहे. आता लोकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

75 हजार 800 कोटींचा अर्थसंकल्प
मनीष सिसोदिया म्हणाले की, 'आप' सरकारने गेल्या 7 वर्षात 1 लाख 78 हजार तरुणांना सरकारमध्ये ठोस नोकरी दिली आहे. यंदाचा अर्थसंकल्प 'एम्प्लॉयमेंट बजेट' आहे. 2022-23 या वर्षासाठी दिल्लीचा (Delhi) अर्थसंकल्प 75 हजार 800 कोटींचा आहे. हा 2014-15 मधील 30,940 कोटी रुपयांच्या बजेटच्या अडीच पट आहे. या बजेटमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 6154 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Pollution: 'गोव्यातील समुद्रकिनारे सर्वाधिक प्रदूषित'! NIO च्या अहवालातून चिंताजनक वास्तव समोर..

Rashi Bhavishya: शनिवार ठरणार शुभदायी! 'या' राशींसाठी लकी दिवस; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

SCROLL FOR NEXT