Hydrabad Murder Case Dainik Gomantak
देश

Hydrabad Case: भक्ती, प्रेम आणि हत्या! पुजाऱ्याचा तरुणीवर जीव जडला, तगादा लावताच काटा काढला

पुजारी साई कृष्ण आणि अप्सरा यांचे एकमेकांवर प्रेम होते. पुजारी साई कृष्ण विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्सरा पुजाऱ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती.

Ashutosh Masgaunde

A temple priest allegedly killed a woman and dumped in a Manhole

हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुजार्‍याने दररोज मंदिरात येणाऱ्या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह मंदिराच्या मागे असलेल्या मॅनहोलमध्ये फेकून दिला.

पुजारी साई कृष्ण आणि तरुणी अप्सरा यांचे एकमेकांवर प्रेम होते असे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे पुजारी साई कृष्ण विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्सरा पुजाऱ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती.

अप्सराकडून लग्नासाठी दबाव

पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून कुरुगंती अप्सरा पुजारी अय्यागरी वेंकट सूर्य साई कृष्णाला तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत होती. अप्सराच्या वागण्याने चिडलेल्या साई कृष्णाने तिला मारण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी तक्रार  

हे प्रकरण हैदराबादच्या शमशाबादजवळील नारकुडा गावाच्या परिसरात घडले. ३ जूनच्या रात्री पुजाऱ्याने अपहरण करून महिलेचे डोके दगडाने ठेचून हत्या केली होती. नंतर मृतदेह मॅनहोलमध्ये टाकण्यात आला. त्यानंतर पुजाऱ्याने मृताच्या आईला पोलीस ठाण्यात नेले आणि अप्सरा हरवल्याची खोटी तक्रार दाखल करायला सांगितले.

साई कृष्णाकडून तरुणीचा गर्भपात

हत्येचा उलगडा झाल्यानंतर अप्सराच्या नातेवाईकांनी अप्सरा गर्भवती असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर साई कृष्णाने तिचा गर्भपातही केल्याचे समोर आले. साई कृष्णाने 6 जून रोजी बाहेरून माती आणून मॅनहोल पूर्णपणे झाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच पुजार्‍याने अप्सराची बॅग आणि सामानही जाळले.  

पुजाऱ्याकडून गुन्हा कबूल

प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि साईकृष्णाची चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर खुनाचा गुन्हा कबूल केला. आता हैदराबाद पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाचे रुपांतर खुनाच्या प्रकरणात करून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT