A newly married couple in Uttar Pradesh’s Bahraich district were found dead the day after their wedding.  Dainik Gomantak
देश

हनिमूनची रात्र अन् सकाळी एकाच बेडवर आढळला पती पत्नीचा मृतदेह; शवविच्छेदनात समोर आले कारण

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये हनिमूनच्या दिवशीच वधू - वर दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळून आले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Uttar Pradesh’s Bahraich: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये हनिमूनच्या दिवशीच वधू - वर दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळून आले आहेत. या प्रकारानंतर घरात एकच गोंधळ उडाला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात, दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

शवविच्छेदन अहवालानुसार वधू-वराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. शवविच्छेदनानंतर नवविवाहित जोडप्याला एकाच चितेवर एकत्र दहन करण्यात आले.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कैसरगंज, गोधिया गावातील 22 वर्षीय प्रताप यादव याचे 30 मे 2023 रोजी लग्न झाले. आनंदी वातावरणात दोघांचे लग्न झाले, नववधू प्रतापच्या घरी आली. लग्नाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घरात जल्लोष सुरू होता. हनिमूनच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एकाच बेडवर दोघांचे मृतदेह सापडल्याने एकच गोंधळ उडाला.

पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली, दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदन केले. अचानक दोघांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक गोंधळून गेले.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून दोघांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. पती-पत्नी दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. नवविवाहित जोडपे प्रताप आणि पुष्पा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT