Teesta Setalvad  Dainik Gomantak
देश

Teesta Setalvad यांच्या अडचणीत वाढ, जामीन देण्यास न्यायालयाने दिला नकार

Godhra Riots In 2002: तिस्ता आणि श्रीकुमार यांना गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी अटक केली होती.

दैनिक गोमन्तक

Godhra Riots In 2002: गुजरातमधील न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांना 2002 च्या दंगली प्रकरणी जामीन देण्यास नकार दिला आहे. तिस्ता आणि श्रीकुमार यांना गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी अटक केली होती. तेव्हापासून दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी न्यायालय यासंबंधी आदेश देणार होते. मात्र न्यायालयाने हा आदेश शनिवारपर्यंत पुढे ढकलला. न्यायालयाने या आठवड्यात तिसऱ्यांदा असे केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे आरोप दोन्ही आरोपींनी फेटाळले आहेत. सेटलवाड, श्रीकुमार आणि पूर्व आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना गेल्या महिन्यात अहमदाबाद (Ahmedabad) गुन्हे शाखेने अटक केली होती.

'तत्कालीन सरकार अस्थिर करायचे होते'

गुन्हे शाखेने या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 468 (फसवणुकीच्या उद्देशाने खोटे पुरावे सादर करणे) आणि 194 (दोष सिद्ध करण्याच्या हेतूने खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) अंतर्गत अटक केली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्या सांगण्यावरुन सेटलवाड आणि श्रीकुमार हे एका मोठ्या कटाचा भाग होते, असे एसआयटीने न्यायालयाला सांगितले होते.

एसआयटीने हा आरोप केला

2002 मधील गोध्रा दंगलीनंतर सेटलवाड यांना पटेल यांच्या सांगण्यावरुन 30 लाख रुपये मिळाले होते, ज्याचा वापर या हेतूने करण्यात आल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. श्रीकुमार हे एक असंतुष्ट सरकारी अधिकारी होते, ज्यांनी संपूर्ण गुजरात (Gujarat) राज्यातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी, नोकरशाह आणि पोलीस प्रशासन यांना बदनाम करण्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT