Doctor Dainik Gomantak
देश

राजस्थानमध्ये डॉक्टरची आत्महत्या; जमाव भडकल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक

राजस्थानमधील (Rajasthan) एका स्थानिक भाजप नेत्याला एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना त्रास देण्यासाठी जमाव भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

राजस्थानमधील स्थानिक भाजप नेत्याला खासगी रुग्णालयातील रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना त्रास देण्यासाठी जमाव भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक, हत्येचा आरोप असलेल्या डॉ अर्चना शर्मा यांनी बुधवारी आत्महत्या केली. यादरम्यान त्यांनी एक हृदयद्रावक सुसाइड नोट पाठीमागे सोडली, ज्यामध्ये त्यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी कारवाईचे आदेश देत पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले.

दरम्यान, मंगळवारी राजस्थानातील (Rajasthan) दौसामधील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीनंतर रक्तस्रावामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी डॉ अर्चना शर्मा यांच्यावर आरोप करत मृत्यूसाठी जबाबदार धरले. यानंतर मृत रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर निदर्शनेही केली. पोलिसांनी डॉक्टर शर्मा आणि त्यांच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा लागला. त्याचवेळी अर्चना शर्मा (Archana Sharma) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर राज्य पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत डॉक्टरही (Doctor) रस्त्यावर उतरले. यादरम्यान डॉ. शर्मा यांनी आपल्या मृत्यूपश्चात पती आणि दोन लहान मुलांना त्रास देऊ नये, असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.

डॉ अर्चना शर्मा यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले, "रुग्णाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करुनही, प्रसूतीनंतरच्या रक्तस्रावामुळे या महिलेचा मृत्यू झाला." "निर्दोष डॉक्टरांना त्रास देऊ नका."

दुसरीकडे, डॉ. अर्चना शर्मा यांचे पती डॉ. सुनील उपाध्याय यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, "पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी माझ्या पत्नीविरोधात कलम 302 (Murder) चा गुन्हा कसा नोंदवला? डॉक्टरांना त्रास देणारा कायदा आणि पैशाची मागणी थांबवा." माझी पत्नी मेली आहे, परंतु इतर निष्पाप डॉक्टरांचे काय?"

शिवाय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याप्रकरणी कारवाईचे आश्वासन देत ट्विट केले की, "डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुःखद आहे. डॉक्टरांना आपण देव मानतो. प्रत्येक डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु काही अनुचित प्रकार घडल्यास डॉक्टरांना दोष देणे योग्य नाही."

या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

अटक झालेल्या नेत्याने काँग्रेस सरकारवर निशाणा साधला

भाजपचे प्रदेश सचिव जितेंद्र गोठवाल (Jitendra Gothwal) यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत म्हटले की, “मला अटक करण्यासाठी पोलीस काल मध्यरात्री जयपूरमधील माझ्या घरी पोहोचले. लालसोट येथील डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला. आयपीसी कलम 306 लावले माझ्यावर लावण्यात आले.

गोठवाल यांनी आरोप केला की "काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना रेल्वे तिकीट पाठवल्याचा बदला राज्य सरकार घेत आहे." त्यांना जयपूरला येण्याचे निमंत्रण दिले जेणेकरुन त्या महिलांवर होणारे अत्याचार पाहू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT