8th Pay Commission Update Dainik Gomantak
देश

8th Pay Commission: विलंब झाला तरी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा! जानेवारी 2026 पासून एरिअर मिळणार? मूळ पगार किती वाढणार? समजून घ्या संपूर्ण गणित

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sameer Amunekar

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी कधी लागू होतील, त्याचा पगारावर किती परिणाम होईल आणि अंमलबजावणीला विलंब झाल्यास मागील कालावधीचा एरिअर मिळणार का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर यासंदर्भात विविध दावे केले जात असले तरी अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

विलंब झाला तर एरिअरचे काय?

8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या शिफारशी आणि त्यावरील सरकारी निर्णयाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. उदाहरणार्थ, सुधारित वेतन एप्रिल 2027 पासून लागू झाले, तर जानेवारी 2026 ते मार्च 2027 या 15 महिन्यांच्या कालावधीतील फरकाचा एरिअर निर्माण होऊ शकतो.

मात्र, एरिअर मिळणारच असे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. एरिअरची तारीख, पद्धत आणि पात्रता याबाबत सरकारच्या अंतिम निर्णयाला महत्त्व असेल. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही दाव्याला अधिकृत घोषणा समजू नये.

फिटमेंट फॅक्टर ठरवणार पगाराची दिशा

8व्या वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. याच आधारे सध्याच्या बेसिक पगारात मोठा बदल होऊ शकतो. 7व्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यामुळे किमान बेसिक पगार 7 हजार रुपयांवरून 18 हजार रुपये झाला होता.

आता कर्मचारी संघटनांकडून 3.68 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, काही अंदाजांनुसार सरकारकडून 2.86 किंवा त्याच्या आसपासचा आकडा विचारात घेतला जाऊ शकतो. मात्र, 8व्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही.

18 हजार बेसिक पगार असल्यास किती फरक पडू शकतो?

समजा, उदाहरण म्हणून 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू झाला. सध्याचा बेसिक पगार 18 हजार रुपये असल्यास 18,000 × 2.86 या गणनेनुसार संभाव्य नवीन बेसिक पगार 51,480 रुपये होऊ शकतो.

यामुळे सध्याच्या 18 हजार रुपयांच्या तुलनेत बेसिकमध्ये 33,480 रुपयांचा फरक पडेल. 15 महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास केवळ बेसिकमधील फरकाच्या आधारावर सुमारे 5.02 लाख रुपयांचा आकडा तयार होतो. मात्र हा फक्त उदाहरणात्मक अंदाज आहे. प्रत्यक्ष एरिअरची रक्कम वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशी, सरकारी आदेश आणि विविध भत्त्यांच्या गणनेवर अवलंबून असेल.

50 हजार बेसिक पगार असल्यास गणित काय?

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 50 हजार रुपये असेल आणि उदाहरण म्हणून 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर संभाव्य नवीन बेसिक 1,43,000 रुपये होऊ शकतो.

म्हणजे सध्याच्या बेसिकच्या तुलनेत 93 हजार रुपयांचा फरक पडू शकतो. 15 महिन्यांच्या कालावधीचा विचार केल्यास बेसिक फरकावर आधारित रक्कम सुमारे 13.95 लाख रुपये, म्हणजे जवळपास 14 लाख रुपये होऊ शकते.

DA, HRAसह इतर भत्त्यांचाही परिणाम

प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार आणि एरिअर केवळ बेसिक पगारावर ठरत नाही. महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर संबंधित भत्त्यांचाही त्यावर परिणाम होतो. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरचा अंतिम आकडा आणि भत्त्यांबाबत सरकारकडून होणारे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टीची प्रतीक्षा करावी?

8व्या वेतन आयोगाबाबत अनेक अंदाज आणि दावे सध्या चर्चेत आहेत. मात्र, नवीन बेसिक पगार, फिटमेंट फॅक्टर, अंमलबजावणीची तारीख आणि एरिअरची पद्धत याबाबत अंतिम चित्र सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

त्यामुळे सध्या 2.86 किंवा 3.68 फिटमेंट फॅक्टर निश्चित झाला आहे किंवा लाखो रुपयांचा एरिअर हमखास मिळणार आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, अंमलबजावणीला विलंब झाल्यास मागील कालावधीसाठी आर्थिक फरक कसा दिला जाईल, हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT