Bus Accident ANI
देश

चित्तूरमध्ये बस दरीत कोसळल्याने 7 जण ठार, 45 जखमी

ही खाजगी बस अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून 52 लोकांना एका लग्नाच्या पार्टीला घेऊन जात होती.

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये एक मोठा रस्ता अपघात (Bus Accident) समोर आला आहे. येथे काल रात्री बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जण जखमी झाले आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती तिरुपती येथिल पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तिरुपतीपासून (Tirupati) 25किमी अंतरावर असलेल्या बाकपेटा येथे हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी प्राथमिक माहितीही त्यांनी दिली आहे.

ही खाजगी बस अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून 52 लोकांना एका लग्नाच्या पार्टीला घेऊन जात होती. चित्तूरमधील (Chittoor) नागरीजवळील गावात ही बस जाणार होती. बस घाट रोडने जात असताना वाहनचालकाचा ताबा सुटला आणि ती अडुपुटप्पी दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, दरी 50 फूट खोल असल्याने आणि रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारात कारवाईत अडथळे येत होते. तरीही जवानांचे सकाळपर्यंत बचावकार्य सुरूच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT