56,000 tons of bio-medical waste in India in a year dew to COVID-19 Dainik Gomantak
देश

अबब! भारतात एका वर्षात 56 हजार टन जैव-वैद्यकीय कचरा

दैनिक गोमन्तक

मागील दीड वर्षांपासून देशात कोरोनाने(COVID-19) अक्षरश थैमान घातले आहे, भारतात(India)आतापर्यंत जवळपास साडेचार लाख लोकांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू(Covid Death) झाला आहे. कोरोनाची परिस्थिती किती विदारक झाली होती याचा अंदाज केवळ याच एका गोष्टीने लावू शकतो की देशात गेल्या फक्त एका वर्षात 56,000 टन इतका जैव-वैद्यकीय (Bio Medical Waste)कचरा कोरोनाने निर्माण झाला आहे. असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जो कचरा जैव-वैद्यकीय प्रक्रियेतून निर्माण होतो त्याने त्या ठिकाणाचा संसर्गाचे प्रमाण ठरवला जातो. हे पाहता या एका वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक 8,317 टन इतका जैव-वैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे त्यापाठोपाठ केरळ 6,442, गुजरात 5,004, तामिळनाडू 4,835, दिल्ली 3,995, उत्तर प्रदेश 3,881 आणि कर्नाटकने 3,133 टन इतका कचरा निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता महाराष्ट्राचा विचार करता राज्यात सगळ्यात जास्त कोरोनाचा प्रसार झाला होता.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार संसर्ग आणि कचरा यांच्यात संपूर्ण सहसंबंध आहे कारण केवळ आकडेवारी दर्शवते की हे परिस्थितीशी विसंगत आहे.

हा निर्माण होणार जैव-वैद्यकीय कचरा किती प्रमणात निर्माण होतो अन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने एक BMW नावाचे ॲप विकसित केले आहे. मे महिन्यापर्यंत या BMW चे देशात एकूण 198 सेंटर होते ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 29 तर कर्नाटकात एकूण 26 सेंटर आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दहा मे रोजी दररोज सुमारे 250 टन या कचरा निर्मितीची नोंद झाली असून हे खरेखरे पाहता खूप जास्ती कचरा निर्मिती मानली जात आहे.जेंव्हा देशात कोरोनाची दुसरी लाट शिखरावरती होती त्यावेळी दररोज जवळपास सगळ्या राज्यात 180–220 टॅन इतका कचरा निर्मण होत होता.

आंतरराष्ट्रीय कचरा निर्मितीचा अभ्यास करणाऱ्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर पॉप्युलेशन सायन्स विभागाचे प्राध्यापक अपराजिता चट्टोपाध्याय म्हणाले की कोरोनाने भारतातील बायोमेडिकल कचरा हाताळण्याच्या परिस्थितीचाच खुलासा केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय कचर्‍याचे मूल्यांकनः सेजच्या कचरा व्यवस्थापन व संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहे.

मात्र चट्टोपाध्याय यांनी असेही नमूद केले आहे या आकडेवारीक घरातील कचऱ्याच्या ठिकाणी जनतेने तयार केलेल्या बायोमेडिकल कचर्‍याच्या अंतिम बिंदूबद्दल कोणतेही स्पष्टीकरण नाही आहे.

पीपीई कचर्‍याचा एक मुख्य भाग आहे. साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या काळात, कोविड रूग्णाद्वारे व्युत्पन्न केले जाणारे अन्न कचरा देखील जैव-वैद्यकीय कचरा आणि ज्वलनशील पदार्थ मानला जात असे.आणि आता पीपीई किट , मास्क , हॅन्ड ग्लोव्स , सूती कापड , शू कव्हर, सुया, सिरिंज आणि आयव्ही फ्लुइड बाटल्या कोविड बीएमडब्ल्यू मानल्या जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT