Terrorist Attack On Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Jammu and Kashmir: काश्मीरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली.

Manish Jadhav

Jammu and Kashmir: काश्मीरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली. सुरक्षा दलाने कुपवाडा येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) मोठ्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना ठार केले.

लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आणि उत्तर काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

या कारवाईबाबत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना ठार केले.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा येथील माछिलमध्ये झालेल्या कारवाईत लष्कराच्या पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), काश्मीर झोन विजय कुमार म्हणाले की, “लष्करचे पाच दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख पटवली जात आहे. शोध मोहीम सुरु आहे.”

जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी या भागांचा दौरा केला ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ''पोलीस आणि लष्करांची संयुक्त कारवाई अद्याप संपलेली नाही. संध्याकाळपर्यंत ऑपरेशन पूर्ण झाल्यावर अधिक माहिती दिली जाईल,” असेही ते पुढे म्हणाले.

सिंह यांनी पुढे सांगितले की, “येथे अनेक शिबिरे, लॉन्चिंग पॅड आणि प्रशिक्षण केंद्रे आहेत. POK मध्ये किमान 16 लॉन्चिंग पॅड आहेत. घुसखोरांना पाठवण्यासाठी त्यांच्याकडून या कारवाया सुरुच असतात. कधीकधी शस्त्रास्त्रे आणि नार्को तस्करीचे प्रयत्नही होतात.

डीजीपी सिंह म्हणाले की, घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. मात्र, दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आम्हाला यश येत आहे. सिंह पुढे म्हणाले की, “पाकिस्तान (Pakistan) आणि त्याच्या एजन्सींचे असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलीस आणि लष्कर योग्य ती कारवाई करत आहे. आजचे ऑपरेशन देखील त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे.”

दुसरीकडे, 21 ऑक्टोबर रोजी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एमके साहू यांनी रविवारी एका निवेदनात म्हटले होते की, 'घुसखोरांनी मृतदेह नियंत्रण रेषेच्या पलीकडे ओढून नेले.

दरम्यान, सुरक्षा दलांनी दोन एके रायफल, सहा पिस्तूल, चार चिनी ग्रेनेड, ब्लँकेट आणि पाकिस्तानी आणि भारतीय चलनी नोटांनी भरलेल्या बॅग, पाकिस्तानी औषधे आणि खाद्यपदार्थांसह युद्धसदृश वस्तू जप्त केल्या होत्या.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT