Agra Express way Accident Dainik Gomantak
देश

आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, नवरदेवाच्या भावासह 5 जणांचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु

Manish Jadhav

Agra Express way Accident: आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. येथे ग्रेटर नोएडाहून बिहारमधील देवरियाला लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाड्यांची कार उलटली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात वराच्या भावासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तीन जण सध्या रुग्णालयात जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, आग्रा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा यमुना एक्स्प्रेस वेवर एतमादपूरजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला. कारचा वेग 100 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त होता असे सांगण्यात येत आहे. अचानक टायर फुटल्याने ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि डिव्हायडरला धडकली. जखमींच्या म्हणण्यानुसार, जोरात स्फोट झाल्यानंतर ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर काय झाले त्यांना कळलेच नाही. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा कार उलटलेली होती, कोणीतरी त्यांना कारमधून बाहेर काढत होते. जखमींवर सध्या उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मागून येणाऱ्या कार चालकाने पोलिसांना सांगितले

अपघातानंतर इतर वाहनांतून प्रवास करणाऱ्या लग्नातील पाहुण्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आणि कसेबसे जखमींना अपघात झालेल्या गाडीतून बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कुमार हा ग्रेटर नोएडातील टिग्री गावात राहतो. त्याचे लग्न रविवारी होते, शनिवारी रात्री लग्नासाठी सहा वेगवेगळ्या वाहनांतून लोक ग्रेटर नोएडाहून देवरियाकडे निघाले होते. यावेळी अचानक त्यांच्या ताफ्यातील एक कार उलटली, ज्यामध्ये संतोषचा भाऊ गौतमसह आठ जण प्रवास करत होते. या अपघातात गौतमसह अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT