Myanmar Air Strike Mizoram Border Dainik Gomantak
देश

Myanmar Soldiers: 42 म्यानमार सैनिकांनी मिझोरामच्या पोलिस ठाण्यात घेतला आश्रय; बंडखोरांचा छावणीवर कब्जा

यातच आता, म्यानमारच्या सशस्त्र दलाच्या बेचाळीस जवानांनी सोमवारी संध्याकाळी मिझोरामच्या चांफई जिल्ह्यातील झोखावथर पोलीस ठाण्यात आश्रय घेतला.

Manish Jadhav

42 Myanmar Soldiers Take Shelter At Mizoram Police Station: भारत-म्यानमार सीमेवरील सीमावर्ती भागात म्यानमार लष्कराने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यानंतर सुमारे 2000 लोक मिझोराममध्ये दाखल झाले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, म्यानमार लष्कराच्या हवाई हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या अनेक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मिझोरामच्या चंफई जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यातच आता, म्यानमारच्या सशस्त्र दलाच्या बेचाळीस जवानांनी सोमवारी संध्याकाळी मिझोरामच्या चांफई जिल्ह्यातील झोखावथर पोलिस ठाण्यात आश्रय घेतला. दोन सीमावर्ती गावांमध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर अनेक बंडखोर गटांच्या संयुक्त सैन्याने म्यानमारच्या लष्करी छावणीवर कब्जा केल्यानंतर हे घडले आहे.

झोखावथर पोलिस (Police) ठाण्यातून फोनवर ThePrint शी बोलताना, झोखावथरचे ग्राम परिषदेचे अध्यक्ष (VCP), लालमुआनपुईया म्हणाले की, “हताश होऊन त्यांनी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये (झोखावथर) त्यांच्या सर्व शस्त्रास्त्रांसह आश्रय घेतला.”

दुसरीकडे, राज्याच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ThePrint शी बोलताना सांगितले की, हे प्रकरण गृह मंत्रालयाला कळवण्यात आले.

MHA ने सांगितले की, म्यानमारच्या लष्करी जवानांना आसाम रायफल्सकडे सोपवण्यात यावे, जे 404 किमी लांबीच्या मिझोराम-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करतात. “असाम रायफल्सच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय म्यानमार लष्कराच्या जवानांना म्यानमारच्या लष्करी सरकारकडे सोपवण्याची व्यवस्था करेल,” असेही अधिकारी पुढे म्हणाले.

दरम्यान, अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नसले तरी, स्थानिक सुरक्षा सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सध्या मिझोराम पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 42 लष्करी जवानांना चंफई जिल्ह्यातील हनाहलन या सीमावर्ती गावात नेले जाईल, तेथून त्यांना म्यानमारला परत पाठवले जाईल. MHA म्यानमारच्या लष्कराच्या संपर्कात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, बंडखोरांनी खवमावी लष्करी छावणीवर कब्जा केल्याचे मानले जाते. काचिन इंडिपेंडन्स आर्मी (KIA), चिन नॅशनल आर्मी (CNA) आणि चिनलँड डिफेन्स फोर्स (CDF) यांचे हे संयुक्त सैन्य आहे.

ThePrint ने आधी दिलेल्या वृत्तानुसार, सीडीएफ गनिमांनी म्यानमारच्या लष्करी चौक्यांवर हल्ले केल्यानंतर भारत-म्यानमार सीमेवर अनेक दिवसांपासून चकमकी सुरु आहेत. बंडखोरांनी भारताच्या बाजूने झोखावथरपासून सुमारे 4-5 किमी अंतरावर असलेल्या टिआऊच्या काठावरील रिहखावदार कॅम्प आणि खवमावी गाव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.

लालमुआनपुईया म्हणाले की, ''केआयए-सीएनए-सीडीएफच्या संयुक्त सैन्याने रिहखावदार कॅम्प देखील ताब्यात घेतला होता, जिथे त्यांनी सात म्यानमार सैनिकांना ताब्यात घेतले होते. उरलेले शिबिरावरील हल्ल्यात मारले गेले असावेत आणि छावणीत किती म्यानमार (Myanmar) सैनिक मरण पावले याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT