Indian Navy female recruitment Dainik Gomantak
देश

नौदलाची मोठी घोषणा: अग्निवीर भरतीत 20 टक्के जागा युवतींसाठी राखीव

अग्निपथ योजनेअंतर्गत होणार भरती

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसात युवकांनी देशभर तीव्र विरोध दर्शवलेली योजना म्हणजेच अग्निपथ योजना जी केंद्र सरकारने घोषित केली होती. या योजनेबाबत देशाचे नौदल ही अॅक्शनमोडमध्ये आले आहे. कारण नौदलाने नुकतंच या योजनेच्या पार्श्वभूमीवर युवतींसाठी 20 टक्के जागा राखीव असतील अशी घोषणा केली आहे. या युवतींना शारीरिक चाचणी ही उत्तीर्ण करावी लागणार आहे. (20 per cent vacancies in Agniveer recruitment in Indian Navy reserved for women)

मिळालेल्या माहितीनुसार 24 जून रोजी अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलात अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 5 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, नौदलाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत अग्निवीर नौदलाच्या पहिल्या तुकडीत 20 टक्के महिलांची भरती केली जाईल. ते नौदलाच्या विविध भागांमध्ये आणि शाखांमध्ये पाठवले जातील.

SSR आणि अग्निवीर MR पदांसाठी वयोमर्यादा 17 ते 23 वर्षे

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर SSR आणि अग्निवीर MR या पदांसाठी भरती केली जाईल. दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा 17 वर्षे ते 23 वर्षे आहे. अग्निवीर एसएसआरसाठी गणित आणि भौतिकशास्त्रासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय अग्निवीर एमआरमध्ये तीन श्रेणी असतील. शेफ स्टीवर्ड आणि हायजिनिस्ट. या पदासाठी अर्ज करण्यासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच 10 हजारांहून अधिक महिला उमेदवारांनी नौदलात अग्निवीर होण्यासाठी नोंदणी केली आहे. नौदलाच्या घोषणेनंतर महिलांचा उत्साह वाढला आहे. मात्र, यासाठी महिलांना 8 मिनिटांत 1.6 किमी धावून शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. यासोबतच अर्जासाठी महिलांची उंची 152 सेमी असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT