19 Years Old Teacher Raped By Friends In Chhattisgarh Dainik Gomantak
देश

मैत्रीच्या नात्याला काळीमा! धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने 19 वर्षांच्या शिक्षिकेवर दोघांकडून बलात्कार

धबधब्याला पाहिल्यानंतर दोन्ही तरुणांनी तिला जवळच्या निर्जन भागात नेले. या परिसरात पुटांची झुडपे असून, या तरुणांनी पीडित युवतीला त्यामागे नेऊन तिचा विनयभंग सुरू केला.

Ashutosh Masgaunde

19 Years Old Teacher Raped By Friends In Chhattisgarh Jashpur district:

छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी दोन बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा आदिवासीबहुल जशपूर जिल्ह्यातही असाच एक घृणास्पद गुन्हा घडला आहे.

येथील जशपूर जिल्ह्यात एका 19 वर्षीय शिक्षिकेवर धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने दोन मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर, दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून, पोलीस आता फरार आरोपींच्या मागावर आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, दोन मित्र सद्दाम खान उर्फ ​​सोनू आणि इम्तियाज डांगरी हे जशपूर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेसोबत धबधब्याला पाहायला गेले होते.

तिघांमध्ये चांगली मैत्री होती आणि अनेकदा त्यांचे फोनवर बोलणे व्हायचे. पीडित शिक्षिका मनोहरपूर येथील रहिवासी आहे.

पीडितेने सांगितले की, धबधब्याला पाहिल्यानंतर दोन्ही तरुणांनी तिला जवळच्या निर्जन भागात नेले. या परिसरात पुटांची झुडपे असून, या तरुणांनी पीडित युवतीला त्यामागे नेऊन तिचा विनयभंग सुरू केला.

याला पीडितेने विरोध केला असता तरुणांनी तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली आणि तेथून पळून गेले.

याप्रकरणी तरुणीने पोलीस तक्रार दाखल केली आहे. बगिचा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी सद्दाम खान व इम्तियाज यांच्याविरुद्ध कलम २९४, ५०६, ३२३ व ३७६ नुसार गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

बगिचा पोलिस स्टेशनचे प्रमुख अखिलेश सिंह यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली असून लवकरच दोघांनाही अटक करण्यात येईल.

दरम्यान, भाजप खासदार गोमती साई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोपींवर गंभीर आरोप केले आणि सांगितले की, आरोपींपैकी एक सद्दाम खान हा पूर्वी युवक काँग्रेसचा सचिव होता आणि सोशल मीडिया प्रभारी म्हणूनही काम करत होता.

फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली.त्यांनी काँग्रेसला आपली भूमिका आणि आरोपींसोबतचे संबंध स्पष्ट करण्यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT