Tragic Death Dainik Gomantak
देश

Tragic Death: फॅमिलीसोबतची ट्रीप ठरली अखेरची; गोव्यातून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा रस्त्यातच मृत्यू

Uttar Pradesh: मुलाच्या निधनाने आर्य कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पीडितेचे कुटुंब मूळचे कुंडरकी, मुरादाबाद येथील आहे.

Pramod Yadav

उत्तर प्रदेश: गोव्याहून परतत असताना अकरावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मुरादाबादचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय कुमार आर्य यांचा हा एकुलता एक मुलगा होता. अन्नातून विषबाधा आणि शरीरातील साखरेची पातळी 500 पेक्षा जास्त वाढल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

प्रखर आर्य (16) असे या मृत मुलाचे नाव आहे. गोव्याहून परतत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. प्रखर हा डॉ.विनय यांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाव्यतिरिक्त त्यांना दोन लहान मुली देखील आहेत. मुलाच्या निधनाने आर्य कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पीडितेचे कुटुंब मूळचे कुंडरकी, मुरादाबाद येथील आहे.

एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. विनय कुमार आर्य आणि त्यांचा मित्र कमल छाबरा आपापल्या कुटुंबासह गोव्याला गेले होते. तेथून ते परतत असताना प्रखर आर्य याची प्रकृती वाटेतच खालावली.

ग्वाल्हेरला पोहोचल्यावर त्याला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी त्याला दुसरीकडे रेफर करण्यात आले. दरम्यान, त्याला गुडगावला घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

प्रखर हा उत्तराखंडच्या डीपीएस स्कूलमध्ये इयत्ता 11 वीचा विद्यार्थी होता. 3 जानेवारी रोजी तो कुटुंबासह गोव्याला गेला होता. रविवारी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून बिलासपूरला घरी आणण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

SCROLL FOR NEXT