PM Modi IN Andhra Pradesh PM Modi X - Handle
देश

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

PM Modi In Andhra Pradesh: मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

आंध्रप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कुरनूळ जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमासाठी आरक्षित केलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी ही घटना घडली. विविध विकास कामांच्या उद्धाटनासाठी मोदी आज (१६ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशात आहेत.

कुरनूळ पोलिसांनी याबाबत एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगा ध्वज फडकविण्यासाठी हातात लोखंडी पाईप घेऊन आला होता. त्याच्या हातातील या पाईपचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मुलाचा मृत्यू झाला. मुलगा पाईप उचलून धरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कुरनूळ जिल्ह्यातील मुनागालापाडू गावातील तो रहिवासी होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन, तपास सुरु केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. तर, अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

मोदींनी उद्धाटन केलेल्या विकासकामांमध्ये औद्योगिक क्षेत्र, वीज, रस्ते, रेल्वे वाहतूक, संरक्षण क्षेत्र आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस क्षेत्रातील कामांचा समावेश आहे. मोदींनी गुरुवारी १३,४३० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curti ZP Election: कुर्टीत तिरंगी लढत अटळ! ‘भाजप’पुढे ‘मगो’चे आव्हान, काँग्रेसचीही तयारी; आप, आरजीपीची भूमिका अस्पष्ट

पक्षनिष्ठा, कामावरून ठरवले उमेदवार! दामू नाईकांनी सांगितली निवडप्रक्रिया; पर्रीकरांच्या विचारांचा वारसा कायम असल्याचे प्रतिपादन

Bicholim Police Station: अभिमान! डिचोली स्थानक देशात पाचव्या क्रमांकावर; उत्कृष्ट पोलिस स्थानकांमध्ये निवड Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; किनारी भागात नवे गटार, नवी गंमत

Bhoma Highway: 'गडकरींचे उत्तर दिशाभूल करणारे'! भोमवासीय बगलमार्गाच्या मागणीवर ठाम; वाद चिघळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT